Advertisement

कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी


कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी
SHARES

मुंबई महापालिकेने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय लवकरच सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे या रुग्णालयात कार्डीयोलॉजी, न्यूरोसर्जरी, सिटीस्कॅन आदी विविध अद्यावत सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कांदिवली परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधांबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.

शताब्दी रुग्णालयात मुंबई उपनगरातील अनेक रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे या निर्णयाचा फायदा मुंबई उपनगरातील रुग्णांना देखील होणार आहे. विशेष बाब म्हणजे या रुग्णालयाच्या कामांना राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी मिळाली आहे. आता या रुग्णालयाची इमारत १० मजली असणार आहे.

त्यामध्ये किमान ३२५ खाटा असणार आहेत, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. कांदिवली शताब्दी रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील लोकांसाठी महत्वाचे असल्याने या रुग्णालयाला अद्यावत करून सुपरस्पेशालिटी रुग्णालय म्हणून नावारुपाला आणण्याबाबत येथील लोकप्रतिनिधींनी वारंवार पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात येऊन आता हे कांदिवली शताब्दी रुग्णालय लवकरच कात टाकणार आहे.

सुपरस्पेशलिटी रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयाच्या विकासासाठी आवश्यक पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणे बाकी होते. आता ती मंजुरी मिळाल्याने रुग्णालयाच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. या कामामध्ये बाधक ठरणारी विविध प्रकारची ८४२ झाडे हटविण्यात येणार आहेत.

त्यापैकी केवळ १४९ झाडांची कत्तल करण्यात येणार असून उर्वरित झाडांचे पुनर्ररोपण याच रुग्णालयाच्या परिसरात करण्यात येणार आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येईल व कंत्राटदाराला काम देऊन रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा