Advertisement

केडीएमसी उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी), आय.एम.ए. कल्याण व डोंबिवली यांच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी दिली.

केडीएमसी उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर
SHARES

कल्याण डोंबिवलीत लवकरच पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी), आय.एम.ए. कल्याण व डोंबिवली यांच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी दिली. कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात कल्याण डोंबिवलीतील टास्क फोर्सच्या डॉक्टरांबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

रुग्ण कोरोनामुक्त झाला तरी कित्येक वेळा त्यांच्या फुफुसांमध्ये इन्फेक्शन राहते. अशा रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यावर देखील बाहेरुन ऑक्सिजन द्यावा लागतो आणि काळजी न घेतल्यास या रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी महापालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार आहे. या सेंटरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांवर फिजीओथेरेपी व अन्य उपचार केले जातील,

या बैठकीमध्ये या विषाणूच्या उपचारासाठी काय कार्यपध्दती अवलंबवावी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे या बाबींवर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यावर ताप हे केवळ कोरोनाचे लक्षण नाही. अशक्तपणा, जुलाब अशी अनेक लक्षणे कोरोनामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करुन घेणे गरजेचे आहे, असा मुद्दा तज्ञ डॉक्टरांनी मांडला. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी (नातेवाईकांनी/ हायरिस्क पेशंट) कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे सुलभ होईल असाही मुद्दा या चर्चेत मांडण्यात आला.

कोरोना चाचण्यांची वेळ वाढविल्यास अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल, असा मुद्दा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मांडला. यावर महापालिका कोरोना चाचण्यांची वेळ सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढविण्याचा विचार करीत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. 


हेही वाचा -

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलदरात होणार 'इतकी' वाढ

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर २००० रुपये



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा