Advertisement

केईएममध्ये ब्रेन स्ट्रोकवर मिळणार अद्ययावत उपचार

जगभरात हृदयविकारापाठोपाठ ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी पहिले ४ तास 'गोल्डन अवर्स' मानले जातात. या काळात रुग्णाला त्वरीत उपचार मिळाले नाहीत, तर शरीरातील लकवा पूर्णपणे बरा होण्याची शक्‍यता कमी असते. यातील गांभीर्य लक्षात घेत केईएम रुग्णालयात मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागात अद्यायावत व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे.

केईएममध्ये ब्रेन स्ट्रोकवर मिळणार अद्ययावत उपचार
SHARES

पक्षाघाता (ब्रेन स्ट्रोक)चा झटका आलेल्या रुग्णांना कमी खर्चात अद्ययावत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात नवं व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या नव्या केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असणार असून २४ तासांच्या आत या रूग्णांवर उपचार सुरू करता येणार आहे. पक्षाघातावर उपचार करणारं हे देशातलं पहिलं केंद्र असणार आहे.


'गोल्डन अवर्स' महत्त्वाचे

जगभरात हृदयविकारापाठोपाठ ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी पहिले ४ तास 'गोल्डन अवर्स' मानले जातात. या काळात रुग्णाला त्वरीत उपचार मिळाले नाहीत, तर शरीरातील लकवा पूर्णपणे बरा होण्याची शक्‍यता कमी असते. यातील गांभीर्य लक्षात घेत केईएम रुग्णालयात मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागात अद्यायावत व्यापक पक्षाघात उपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे.


८ कोटी रुपये खर्च

या केंद्राचं उद्धाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं अाहे. तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून इथं अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासून रुग्णांच्या सेवेकरीता हे केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी विशेष डॉक्टरांची टीमही तयार करण्यात आली आहे.


मोफत उपचार

केईएम रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत ३ हजार ६०० रुग्ण ब्रेन स्ट्रोकच्या उपचारांसाठी आले. मात्र त्यापैकी केवळ ५४ रुग्णांना थ्रोम्बोलायरिस हे इंजेक्‍शन मिळाले. या इंजेक्‍शनमुळे मेंदूतील रक्‍ताची गुठळी विरघळते. हे इंजेक्‍शन २५ ते ४० हजारांत उपलब्ध असलं तरीही महापालिका रुग्णालयात यावर मोफत उपचार केले जातात. त्याशिवाय आता सुरू झालेल्या या केंद्रामुळं रुग्णांना उपचार मिळणं अधिकच सोपं होणार असून सर्वांनी ब्रेन स्ट्रोकबाबत जनजागृतीवरही भर दिला पाहिजे
- डॉ संगीता रावत, प्रमुख मज्जातंतू शल्य चिकित्सा विभाग


अशाप्रकारे होणार उपचार

व्यापक पक्षाघाताचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येणार आहे. व्यापक पक्षाघात उपचार केंद्रात अत्याधुनिक मशीनच्या आधाराने थेट मेंदूतील रक्तवाहिन्यात स्टेंट घातले जातील. हे स्टेंट रक्तवाहिन्यातील गुठळी पूर्णपणं विरघळून टाकतील. विशेष म्हणजे यासाठी केवळ २५ मिनिटाचा अवधी लागेल. त्यानंतर तातडीने सिटी स्कॅन, एमआर या महत्त्वपूर्ण चाचण्या केल्या जातील.


२ लाखांचा खर्च

रुग्ण अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवेत दाखल झाल्यानंतर लक्षणं ओळखून वैद्यकीय अधिकारी ब्रेन स्ट्रोक रुग्णाची माहिती वरिष्ठ डॉक्‍टरांना देईल. यासाठी रेडिओलॉजी, अनेस्थेशिया, फिजीशियन, पॅथॅलोजी, न्यूरोसर्जरी विभागातील डॉक्‍टरांची टीम व्हॉट्‌सग्रुपच्या माध्यमातून समन्वय साधत राहणार आहेत. या कामासाठीचं माॅकड्रील एका एनजीओच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. या शस्त्रक्रियेसाठी २ लाखांचा खर्च येईल. परंतु वैद्यकीय योजनांतून ही शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध असणार आहे.



हेही वाचा-

शिवडी रुग्णालयात ६६ कर्मचाऱ्यांना क्षयाची लागण

राज्यातील पहिली लिंग पुनर्रचना ओपीडी सेंट जॉर्जमध्ये



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा