Advertisement

शिवडी रुग्णालयात ६६ कर्मचाऱ्यांना क्षयाची लागण


शिवडी रुग्णालयात ६६ कर्मचाऱ्यांना क्षयाची लागण
SHARES

क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचं मोहीम राबवतं. पण प्रत्यक्षात शिवडी येथील क्षयरुग्णालयात काम करणाऱ्या १७ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच मागील पाच वर्षांत क्षयरोगामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या सर्वांना क्षयरुग्णांकडून लागण झाल्यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी या दोघांना संसर्ग होण्याची दुर्दैवी शक्यता येथ खरी ठरली आहे.


६६ कर्मचाऱ्यांना लागण

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकार (आरटीई) तंर्गत दिलेल्या माहितीनुसार, क्षयरुग्णालयात २०१३ ते २०१८ या पाच वर्षे आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये ६६ कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची लागण झाली आहे. त्यात ११ परिचारिका, २ डॉक्टर, इतर सफाई कर्मचारी, औषध विक्रेते, लॅबमध्ये तसेच क्ष किरण तज्ज्ञ हे क्षयरोगाच्या संसर्गामुळे आजारी पडले होते. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

क्षयरोगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदलला नसल्याची खंत माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी व्यक्त केली. क्षय रुग्णांसाठी जे काम करतात त्यांचा आहार, औषधोपचारपद्धती यावर विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.

क्षयरोग लपवण्याकडे सर्वसामान्यांचा कल होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि रोगप्रतिकारशक्ती यांच्या कमतरतेमुळे रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोग होतो. त्यामुळे नेमका किती जणांना क्षयरोग झाला आहे, याचं निदान होत नव्हतं. जीन एक्सपर्ट तंत्रज्ञान, क्षयरोगावरील औषधोपचार पद्धतीमध्ये झालेल्या बदलांमुळे अधिकाधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे.
- डॉ. ललीतकुमार आनंदे, अधीक्षक, क्षय रुग्णालय शिवडी

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आल्याने कितीजणांना क्षयरोग झाला, याची नोंद होऊ शकली. सहा वर्षांत सतरा जणांना क्षयामुळे मृत्यू झाला असला तरीही हे प्रमाण आता निश्चित नियंत्रणात आल्याचं डॉ. ललीतकुमार यांनी सांगितलं.


वर्षलागण झालेली कर्मचारीसंख्या मृत्यूबरे झालेले रुग्ण उपचार सुरू
२०१३३२१०२२
२०१४११
२०१५
२०१६ ५
२०१७
ऑगस्ट २०१८

हेही वाचा - 

क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीसाठी 'डिझबोर्ड' अॅप

क्षयरोग रुग्णांसाठी 'मर्म' योजना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा