Advertisement

क्षयरोग रुग्णांसाठी 'मर्म' योजना


क्षयरोग रुग्णांसाठी 'मर्म' योजना
SHARES

क्षयरोग रुग्णांसाठी प्रत्येक डॉट्स केंद्रातून औषधं दिली जातात. पण, ही औषधं वेळच्यावेळी टीबी रुग्ण घेतो की नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी आता राज्य सरकारद्वारे ‘मेडिकेशन इव्हेंट अॅण्ड मॉनिटर रिमाइंडर’ म्हणजेच मर्म ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे डॉट्स केंद्रात नोंदणी झालेल्या रुग्णांवर देखरेख ठेवणं सोपं होणार आहे. 'मर्म'द्वारे डॉट्स केंद्रात औषधोपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना औषधांचा एक बॉक्स दिला जाईल. या बॉक्समध्ये एक चीप बसवण्यात आली आहे. ही चीफ डॉट्स केंद्रांना जोडण्यात आली आहे.

अनेकदा रुग्ण औषधं खायचा कंटाळा येतो म्हणून औषधोपचार अर्धवट सोडतात. त्यामुळे टीबीचा विषाणू पुन्हा एकदा रुग्णाच्या शरीरात प्रवेश करुन टीबी पसरवू शकतो. यामुळे एमडीआर लेवलचा टीबी देखील होऊ शकतो.


औषधोपचार अर्धवट सोडल्याने पुन्हा होतो टीबी

टीबी रुग्णांचं लवकर निदान, उपचार सुरू झाले तरी रुग्ण औषधोपचार पूर्ण करत नाहीत. गरीबी आणि महागाई या समीकरणाचा खूप मोठा परिणाम रुग्णांवर होतो. मुंबईत डॉट्स केंद्रातून औषधं घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी २ हजारांहून अधिक रुग्ण औषधोपचार अर्धवटच सोडतात. त्यासाठी मर्म ही योजना सुरू करण्यात आली आहे.


मुंबईत पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. काही रुग्णांना हे बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार आता यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास मुंबईसह अन्य शहरांमध्येही हा उपक्रम राबवला जाईल.

डॉ. संजीव कांबळे, केंद्रीय क्षयरोग नियंत्रण अधिकारी


कसं काम करणार मर्म बॉक्स?

मुंबईत सध्या ९९ डॉट्स केंद्र कार्यरत आहेत. घराशेजारच्या डॉट्स केंद्रात येऊन रुग्ण औषध घेतात. पण नियमित घरी हे रुग्ण औषध घेतायेत का? हे पाहण्यासाठी मर्म बॉक्स मध्ये एक चीप बसवली आहे. औषध घेण्यासाठी हा बॉक्स उघडल्यावर एक मिस कॉल डॉट्स केंद्रांना जाईल. जेणेकरून रुग्णाने औषधं घेतल्याची माहिती मिळू शकेल. इतकंच नाही, तर औषध घेण्यास विसरल्यास या बॉक्समधून अलार्म वाजेल. यामुळे औषधांची वेळ झाल्याचं रुग्णाच्या लक्षात येईल.

अनेकदा क्षयाचं निदान झाल्यानंतर रुग्णांना औषधांसाठी जवळच्या डॉट्स केंद्रात जावं लागतं. याठिकाणी औषधं मोफत उपलब्ध होतात. पण, काही रुग्ण घरी गेल्यावर औषधं घेत नाहीत. यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल.

डॉ. ललितकुमार आनंदे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, क्षय रुग्णालय, शिवडी


टीबीसंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे

० टीबी नियंत्रणासाठी मुंबईत २४ जिल्हा क्षयरोग केंद्र

० राज्यात ५१७ क्षयरोग उपचार पथकं असून मुंबईत ५९ पथक कार्यरत

० संशयित रुग्णांच्या थुंकी नमुना तपासणीसाठी राज्यभरात १ हजार ५२० सुक्ष्मदर्शी केंद्र तर १३० केंद्र मुंबईत

० १५൦ केमिस्ट्सच्या माध्यमातून टीबी रुग्णांना मोफत औषधं

० मुंबईत टीबी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ६ हजार ६൦൦ पेक्षा जास्त संशयितांची वैद्यकीय चाचणी

० ४ हजार ८९१ औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण, तर ६७൦ एक्स-डी-आर म्हणजे औषधांना अजिबात दाद न देणाऱ्या टीबीचे रुग्ण



हेही वाचा

टी.बी. रुग्णांना दरमहा ६३१ रुपयांचा पौष्टिक आहार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा