Advertisement

टी.बी. रुग्णांना दरमहा ६३१ रुपयांचा पौष्टिक आहार

क्षयरोग रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याने या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे क्षयरोग रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आहार देण्याबाबत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वही बनवली आहेत.

टी.बी. रुग्णांना दरमहा ६३१ रुपयांचा पौष्टिक आहार
SHARES

मुंबईत सध्या क्षयरोग (टी.बी.) रुग्णांची संख्या वाढत असून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉट सेंटरमध्ये नोंदणी झालेल्या क्षयरोग रुग्णांना महापालिकेकडून पोष्टिक आहार देण्यासाठी धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. याअंतर्गत प्रौढ रुग्णांना साडेआठ तर बाल रुग्णांना साडेपाच किलो ग्रॅम एवढ्या वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक रुग्णामागे महिन्याला ६३१ रुपये महापालिका खर्च करणार आहे. मात्र, हा आहार रुणांच्या खरोखर पथ्यावर पडणार आहे की केवळ या नावावर संस्थांची पोटं भरली जाणार आहेत, असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे.


मुंबईत २१ टक्के टीबीचे रुग्ण

महाराष्ट्र राज्यातील एकूण क्षयरोग रुग्णांपैकी केवळ मुंबईतच २१ टक्के क्षयरोग रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी मुंबईत सुमारे २५ हजार क्षयरोग रुग्णांची नोंदणी केली जाते. मात्र, क्षयरोग रुग्णांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याने या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे क्षयरोग रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आहार देण्याबाबत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वही बनवली आहेत.


पौष्टिक आहाराची मिळणार पॅकेट्स

त्यानुसार महापालिकेच्या आहार तज्ज्ञांनी क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आहाराची (धान्य)पॅकेट्स देण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमार्फत नोंदणी झालेल्या रुग्णांना त्याप्रमाणे पौष्टिक आहाराचा अर्थात धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. या मध्ये पुढील दोन वर्षांकरता प्रौढ रुग्णांसाठी १ लाख ११ हजार ६०० तर बाल रुग्णांसाठी १० हजार ७०४ पौष्टिक आहार पॅकेट्सचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये प्रौढ रुग्णांसाठी ६३१ रुपये, तर बाल रुग्णांसाठी ४६१ रुपये प्रत्येक पॅकेट्ससाठी खर्च करण्यात येणार आहेत.


प्रौढ रुग्णांना दिला जाणार आहार - ८.५ किलो

तांदूळ - ३ किलो
बेसन पीठ - १ किलो
मूग डाळ - १ किलो
मटकी - १ किलो
शेंगदाणा - १.५ किलो
गूळ - १ किलो


बाल रुग्णांना दिला जाणार आहार - ५.५ किलो

तांदूळ - १.५ किलो
बेसन पीठ - १ किलो
मूग डाळ - १ किलो
मटकी - ०.५ किलो
शेंगदाणा - १ किलो
गूळ - ०.५ किलो




हेही वाचा

महापालिका रुग्णालयेही आता इस्कॉनच्या ताब्यात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा