Advertisement

राज्यातील पहिली लिंग पुनर्रचना ओपीडी सेंट जॉर्जमध्ये


राज्यातील पहिली लिंग पुनर्रचना ओपीडी सेंट जॉर्जमध्ये
SHARES

सेंट जॉर्ज रुग्णालयात दोन लिंगबदलाच्या शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अनेकांनी याबाबत विचारणा केली होती. आता वाढता प्रतिसाद लक्षात घेत सेंट जॉर्ज रुग्णालयात पहिली लिंग पुनर्रचना ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयात बीडच्या ललित कुमारवर याच्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाच वर्षीय मुलीवरही यशस्वीरित्या लिंगबदलाची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर अनेकांनी लिंगबदल शस्त्रक्रियेबाबत जाणून घेण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात चौकशी करत होते. याबाबत वाढता प्रतिसाद लक्षात घेता सेंट जॉर्ज रुग्णालयात पहिली लिंग पुर्नरचना ओपीडी तयार करण्यात आली. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अशाप्रकारची लिंग पुर्नरचना करणारी ही पहिली ओपीडी असून नुकतंच याचं उद्घाटन करण्यात आलं.


ओपीडीचं उद्घाटन

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात बुधवारी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सिटीस्कॅन विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. यासोबत लिंग पुर्नरचना ओपीडी, कॉस्मेटोलॉजी ओपीडी आणि रोटी मेकिंग मशीनचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. दरम्यान रुग्णालयात सिटीस्कॅन विभाग सुरू करण्यात आल्यानं रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर आता सिटीस्कॅन करणं सोपं होणार आहे.

रुग्णालयात लिंग पुनर्रचना ओपीडीचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. ललित आणि पाच वर्षांच्या मुलावर लिंग बदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर या शस्त्रक्रियेच्या चौकशीसाठी रुग्णालयात आतापर्यंत १३ व्यक्तींचे फोन आले आहे. त्यामुळे रुग्णालयात लिंग पुर्नरचना ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज

लोकांची प्रश्न सोडवणं आमचं काम असून त्यात आम्हाला आनंद मिळतो. हा विभाग सुुरू करण्यासाठी ज्या व्यक्तींनी योगदान दिलं आहे त्यांचे मी आभार मानतो. त्याशिवाय लवकरात लवकर सेंट जॉर्जमध्ये एमआर मशिन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

या उद्घाटन सोहळ्याला सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांच्यासह उद्योग मंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षण व औषध दव्ये विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिंगारे, सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, जे. जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे आणि कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश्री कटके उपस्थित होत्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा