पुन्हा डॉक्टरवर हल्ला...पुन्हा निषेध

 KEM Hospital
पुन्हा डॉक्टरवर हल्ला...पुन्हा निषेध
पुन्हा डॉक्टरवर हल्ला...पुन्हा निषेध
पुन्हा डॉक्टरवर हल्ला...पुन्हा निषेध
See all

सायन - डॉक्टरांवर झालेल्या हल्यांच्या विरोधात डॉक्टरांनी गेल्या चार दिवसांपासून संप पुकारला आहे. पण, सायन रुग्णालयात बुधवारी रात्री एका महिला डॉक्टराला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याचा निषेध म्हणून गुरुवारी दुपारी परळ पूर्व येथील केईएम रुग्णालयात डॉक्टरांनी संपाचे रूपांतर आंदोलनात केले. रुग्णालयाच्या अंतर्गत आवारात फिरून त्यांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्याचा निषेध केला.

या वेळी अनेक डॉक्टरांनी आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याविरोधात सरकारने लेखी आश्वासन द्यावे आणि कायदा करावा. त्याशिवाय संरक्षण आणि सुरक्षा मिळणार नाही. अशी मागणी केली आहे. तसंच, जोवर कायदा होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भावनाही या वेळी डॉक्टरांनी व्यक्त केली.

Loading Comments