Advertisement

वारंवार नाकातून पाणी येतंय? मग दुर्लक्ष करू नका


वारंवार नाकातून पाणी येतंय? मग दुर्लक्ष करू नका
SHARES

२० वर्षीय युवक मोहम्मद अरफाद खान याच्यावर नाकाद्वारे दुर्बिणीच्या सहाय्यानं म्हणजेच ट्रान्सनसल एंडोस्कोपिक नॅव्हिगेशनल सर्जरी यशस्वीपणे पार पाडली. कोहिनूर रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ (.एन.टी सर्जन) डॉ संजय हेलाले यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. हा युवक सेलिब्रोस्पायनल फ्लुईड रायनोरीया या आजारानं ग्रस्त होता. यामध्ये त्याच्या मेंदूतील पाणी (ब्रेन फ्लुइड) नाकाद्वारे बाहेर येत होते

एका न्यूरोसर्जनच्या सल्ल्यानुसार, त्याचे कुटुंब डॉ हेलाले यांच्याकडे कोहिनूर हॉस्पिटलमध्ये आले. ही शस्त्रक्रिया  साधारणतः चेहरा किंवा डोक्याची कवटी उघडून केली जाते पण डॉ संजय हेलाले यांनी चेहरा किंवा कवटी यावर कोणताही कट न करता ही शस्त्रक्रिया नाकाद्वारे केली.   


दुर्लक्ष करू नका

मुंबईतील रहिवासी असलेल्या मोहम्मद अरफाद खान यांच्या उजव्या नाकपुडीतून गेली ८-१० वर्षे सारखे पाणी येत होते. जरा खोकले किंवा थोडे खाली वाकले तरीही पाणी यायचे. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना वाटले सर्दी किंवा इन्फेक्शनमुळे होत असावे पण सगळ्या चाचण्या केल्यावर कळलं त्यांचा मेंदूतील द्रव (ब्रेन फ्लुइड) नाकाद्वारे बाहेर येत होते


कशामुळे यायचं नाकातून पाणी?

मोहम्मद अरफाद खान याला २०१० मध्ये एक अपघातामध्ये डोक्याला मार लागला. त्यावेळी त्याचा भुवयाच्या वरील फ्रॉन्टल सायनस इथल्या हाडाला चीर गेली. तिथून मेंदूतील द्रव नाकाद्वारे बाहेर येऊ लागले. साधारणपणे मेंदूतील द्रव गळती (ब्रेन फ्लुइड लीक) एन्डोस्कोपी द्वारे चेक करून ठिक केली जाते. पण खान यांच्या केसमधील गळतीची जागा भुवयाच्या वरील फ्रॉन्टल सायनसच्या इथं असल्यामुळे नॅव्हिगेशन पद्धत वापरली गेली. त्यामुळे मेंदूच्या कुठल्या भागामध्ये दोष आहे ते अचूक दिसून आले.

डॉ. संजय हेलाले म्हणाले "वारंवार गळणाऱ्या नाकामुळे खान यांना रोजची कामेही नीट करता येत नव्हती. एखाद्या मोठ्या अपघातामध्ये मेंदूला मार लागला तर मेंदूंच्या आतील भागात चीर किंवा  छिद्र  पडून 'सेलिब्रोस्पायनल फ्लुईड रायनोरीया' हा आजार उद्भवतो. सगळ्या टेस्ट आणि रिपोर्ट्स पाहिल्यानंतर आम्ही नाकाद्वारे सर्जरी ( ट्रान्सनसल एंडोस्कोपिक नॅव्हिगेशनल सर्जरी) करून ते छिद्र बुजवले. सर्जरीच्यावेळी अधिक सुरक्षेतेसाठी न्युरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी देखील उपस्थित होते. आता रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे आणि त्याची रोजची कामे अगदी सहजपणे करू कतो."

           

ब्रेन फ्लुइडमुळे जीवाला धोका

अपघातानंतर लगेच दोन महिन्यात त्याला ही लक्षणं दिसून आली. त्यानंतर गेली १० वर्ष अधून मधून हा त्रास सुरुच होता. पण गेल्या २ महिन्यापासून हा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागला. सगळ्या मेडिकल टेस्ट केल्यावर या आजाराचं निदान झालं. ब्रेन फ्लुइड लीकमुळे जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. दुसऱ्या हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जननी या वरील उपायासाठी बाहेरून स्कल (कवटीचा भाग) उघडून शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं होतं. पण रुग्णाचे नातेवाईक त्याला कोहिनूर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले.  




हेही वाचा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा