Advertisement

मुंबर्इत धावणार बार्इक अॅम्ब्युलन्स विथ स्ट्रेचर

अाधुनिक बार्इक अॅम्ब्युलन्सला स्ट्रेचरची सोय असून या स्ट्रेचरवर रुग्णाला झाेपवून रूग्णालयात वेळेवर दाखल करणं शक्य हाेणार अाहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गिरगावमध्ये १ मे रोजी या रुग्णवाहिकेचं लाेकार्पण करण्यात येणार अाहे.

मुंबर्इत धावणार बार्इक अॅम्ब्युलन्स विथ स्ट्रेचर
SHARES

मुंबईतील वाहतूककोंडीतून मार्ग काढत रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणारी बार्इक अॅम्ब्युलन्स रुग्णांसाठी जीवनदायी ठरत अाहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याने शहरातील स्वयंसेवी संस्थाही बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यानुसार लाेढा फाऊंडेशनने देखील बार्इक अॅम्ब्युलन्स सेवा देण्याचं ठरवलं अाहे.


१ मे रोजी लोकार्पण

विशेष म्हणजे या अाधुनिक बार्इक अॅम्ब्युलन्सला स्ट्रेचरची सोय असून या स्ट्रेचरवर रुग्णाला झाेपवून रूग्णालयात वेळेवर दाखल करणं शक्य हाेणार अाहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गिरगावमध्ये १ मे रोजी या रुग्णवाहिकेचं लाेकार्पण करण्यात येणार अाहे.पहिलीवहिली अॅम्ब्युलन्स

सिंगापूर, हाॅंगकाॅंग, ब्राझील, जर्मनी, केनिया यासारख्या विकसित देशांच्या धर्तीवर स्ट्रेचरची सुविधा असलेली बार्इक अॅम्ब्युलन्स मुंबर्इत पहिल्यांदाच सुरू करण्यात येत अाहे. या रुग्णवाहिकेची सेवा माेफत असेल. या बाईक अॅम्ब्युलन्सला प्रतिसाद मिळाल्यास अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवण्यात येर्इल, असं अा. मंगलप्रभात लाेढा यांनी माहिती देताना सांगितलं.


आणखी काय सुविधा?

हैद्राबादमधील कंपनीने तयार केलेल्या या बार्इक अॅम्ब्युलन्सची रूंदी ५ फूट असून वाहतूककाेंडीतून ही अॅम्ब्युलन्स सहज मार्ग काढू शकते. बाईकला जाेडलेल्या स्ट्रेचरवर रुग्णाला झाेपवून सहज नेता येऊ शकतं. हे स्ट्रेचर अच्छादित असल्यामुळे रूग्णाला काेणताही त्रास हाेणार नाही. या बार्इकसाेबत अाॅक्सिजन सिलेंडर, अाणीबाणीच्या काळातील प्रथमाेपचार संच, नाडी रक्तदाब, साखर तपासणी करणारं यंत्र अादी अत्याधुनिक सुविधांनी ही बार्इक अॅम्ब्युलन्स सज्ज असेल, असं लाेढा यांनी सांगितलं.


आतापर्यंत २५०० रुग्णांना उपचार

राज्य सरकारने गेल्या वर्षी अाॅगस्ट महिन्यात सुरू केलेल्या बार्इक अॅम्ब्युलन्सला देखील चांगला प्रतिसाद मिळत असून अातापर्यंत २५०० व्यक्तींना वेळेवर उपचार देत त्यांचे प्राण वाचवण्यात यश अालं अाहे. दिवसाला सुमारे १०० पेक्षा अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात.हेही वाचा-

बाईक अॅम्ब्युलन्स’ची सेवा सुसाट, 2 महिन्यांत 450 रुग्णांचे वाचवले प्राणसंबंधित विषय
Advertisement