Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

महाराष्ट्राने ओलांडला १.५ कोटी लसीकरणाचा टप्पा!

महाराष्ट्राने मंगळवार २७ एप्रिल २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

महाराष्ट्राने ओलांडला १.५ कोटी लसीकरणाचा टप्पा!
SHARES

महाराष्ट्राने मंगळवार २७ एप्रिल २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचं लसीकरण करणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे, असं राजेश टोपेंनी नमूद केलं आहे.

महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले असून एवढ्या मोठ्यासंख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. काल दिवसभरात ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी नोंद केली आहे, असं ट्विट राजेश टोपे यांनी केलं आहे. 

सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने नवीन विक्रम नोंदवला होता. त्याआधी ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.  

हेही वाचा- विक्रमी नोंद! महाराष्ट्रात एकाच दिवशी ५ लाखांहून अधिक जणांचं लसीकरण

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र (maharashtra) पुढे असून २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासूनच राज्य लसीकरणात अग्रसेर राहीलं आहे. 

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला ८ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट गाठता येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपं यांनी सांगितलं. 

(maharashtra cross 1 crore 50 lakh covid 19 vaccination mark on 27th april 2021)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा