कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद सोमवारी केली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचं लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात ५ लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झालं असून त्यात आजची संख्या मिळवली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होते. उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.
हेही वाचा- लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी
Maharashtra has achieved a milestone in its COVID vaccination drive today
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 26, 2021
Over 5 lakh citizens vaccinated in a day!
Soon, the mark of 1.5 crore citizens vaccinated will be achieved
CM Uddhav Balasaheb Thackeray & Health Minister @rajeshtope11 have congratulated the machinery
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र (maharashtra) पुढे असून आज २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीलं आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला ८ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट गाठता येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपं यांनी सांगितलं.
राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
(Maharashtra has registered over 5 lakh citizens vaccinated in a day on 26th april 2021)
हेही वाचा- भावा तुझ्या कार्याला सलाम! ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 'या' खेळाडूनं केली ३७ लाख रुपयांची मदत