Advertisement

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला ४ कोटी लस मात्रांचा टप्पा

महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत कोरोना प्रतिबंधात्मक लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला ४ कोटी लस मात्रांचा टप्पा
SHARES

कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले.

देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र (maharashtra) आघाडीवर असून आज दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ४ कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९हजार ३३९ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ एवढी आहे.

आज दुपारपर्यंत राज्यात १ लाख २० हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबईत स्वाईन फ्ल्यूचंही संकट, १२ रुग्ण आढळले

तर, भारतात सोमवार पर्यंत एकूण ४० कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.  

आकडेवारीनुसार, ४० कोटी ४४ लाख ६७ हजार ५२६ नागरिकांनी कोरोनावरील (covid19) लस घेतली आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आलं. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटी २ लाख ६८ हजार ८८२ इतकी आहे. तर ७५ लाख ३८ हजार ८७७ जणांना दोन्ही डोस घेतले आहेत. 

हेही वाचा- गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा