Advertisement

सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय, प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिले.

सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय, प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
SHARES

मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा- पुरेशी लस मिळण्याची शक्यता कमी, ‘या’ प्रकारे कोरोनाची तिसरी लाट थोपवावी लागेल- मुख्यमंत्री

नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालया सोबतच नवीन नर्सिंग कॉलेजचा प्रस्तावही सादर करण्यात यावा, असं सांगून अमित देशमुख यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात सध्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतो हे लक्षात घेता या रुग्णालयासाठी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाअधिक खाटांची संख्या वाढविण्यात यावी,  रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रही तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश अमित देशमुख यांनी दिले.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचं रूपांतर सध्या कोविड रुग्णालयात करण्यात आलं असून  क्रिटिकल केअर युनिट म्हणून हे रुग्णालय उपचारासाठी राखून ठेवण्यात आलं आहे. असं असलं तरीही या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे राष्ट्रीयस्तरावरील बरे होणाऱ्या रुग्णांच्या सरासरी पेक्षा कमी असू नये याची दक्षता घेण्यात यावी, असंही अमिम देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

(maharashtra government to build medical college for saint george and GT hospital in mumbai )

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा