Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

पुरेशी लस मिळण्याची शक्यता कमी, ‘या’ प्रकारे कोरोनाची तिसरी लाट थोपवावी लागेल- मुख्यमंत्री

सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा पाहता लस उत्पादकांकडून पुरेशा प्रमाणात महाराष्ट्राला लस मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट देखील अटळ मानली जात आहे.

पुरेशी लस मिळण्याची शक्यता कमी, ‘या’ प्रकारे कोरोनाची तिसरी लाट थोपवावी लागेल- मुख्यमंत्री
SHARES

सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा पाहता लस उत्पादकांकडून पुरेशा प्रमाणात महाराष्ट्राला लस मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट देखील अटळ मानली जात आहे, अशा स्थितीत ही तिसरी लाट थोपवण्यासाठी आपल्याला योग्य नियोजन करावं लागेल, याची जाणीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला करून दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स आपण तयार करणार आहोत. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

लसीकरणाचं नियोजन महत्त्वाचं

लसीकरणाच्या जोरावर तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचं सूक्ष्म नियोजन करण्यात यावं. १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला लसीचे १२ कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसंच दिवसाला १० लाख लोकांना लस देण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, तरीही पुरेशी लस मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आपल्याला सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

हेही वाचा- राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण?, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!

आॅक्सिजन पुरवठा सुरळीत करा

गेले वर्षभर आपण कोरोनाशी (coronavirus) लढत असल्याचं सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचं काम करत आहेत, याचं समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल. पण सध्या महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं. 

गाफीलपणा नको

त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका, हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

(be prepared for covid 19 third wave says maharashtra cm uddhav thackeray)


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा