Advertisement

‘भारत बायोटेक’च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार- अजित पवार

‘कोव्हॅक्सिन’ लस उत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्लांटसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

‘भारत बायोटेक’च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार- अजित पवार
SHARES

‘कोव्हॅक्सिन’ लस उत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्लांटसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित समर्पित कोविड सेंटरचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राहुल कुल, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, यवतचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर (सर्वजण व्हीसीद्वारे)  आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आदींसह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तीनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावा तसंच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात यावं. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

हेही वाचा- मुलांसाठी नवी मुंबईत ३०० खाटांचं विशेष काळजी केंद्र

कोरोना (coronavirus) प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लांटला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांचं नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने देऊळगाव गाडा इथं विस्तारित समर्पित कोविड सेंटर सुरु केल्याने या परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

सध्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातूनच देशभरात कोविशील्ड लशीचा पुरवठा केला जात आहे. त्यातच कोव्हॅक्सिनचंही पुण्यात उत्पादन सुरू झाल्यास महाराष्ट्रात (maharashtra) लस उत्पादन आणि वितरणाला गती मिळू शकेल.

(maharashtra government will allocate a land to bharat biotech says ajit pawar )

हेही वाचा- खासगी कार्यालये, गृहनिर्माण संस्थांमध्येही होणार लसीकरण; बीएमसीने जाहीर केली नियमावली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा