Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मोफत लसीकरणासाठी महाराष्ट्राला लागणार ‘एवढ्या’ लसी, येणार ‘इतका’ खर्च!

महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देणं खरंच शक्य आहे की नाही? त्यासाठी नेमक्या किती लसी लागतील?

मोफत लसीकरणासाठी महाराष्ट्राला लागणार ‘एवढ्या’ लसी, येणार ‘इतका’ खर्च!
SHARES

महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देणं खरंच शक्य आहे की नाही? त्यासाठी नेमक्या किती लसी लागतील? या लसी विकत घेण्याकरीता किती खर्च येईल? हा खर्च राज्याला पेलणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सर्वांची उत्तरं दिली.

येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला देखील सुरूवात होणार आहे. या टप्प्यातील नागरिकांची संख्या खूपच मोठी असल्याने सर्वांचंच मोफत लसीकरण करणं राज्याला शक्य होईल अथवा नाही, यावर सध्या चर्चा सुरू आहे. त्यावर पत्रकार परिषदेत माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यातील सर्व नागरिकांना लस मोफत द्यावी का? या विषयावरमंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीतच लसीकरणासंदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) जाहीर करतील.

हेही वाचा- मोफत लसीकरणावर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच- अजित पवार

येत्या १ मे पासून १८ ते ४४ वर्षांच्या आतील नागरिकांचं देखील लसीकरण करण्यात येणार आहे. या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आम्ही मंत्रिमंडळाला एक नोट तयार करुन पाठवली आहे. यामध्ये मोफत दिली तर किती खर्च, काही घटकांना मोफत दिली तर किती खर्च यासंदर्भातील वेगवेगळे पर्याय आणि आकडेवारी देण्यात आली आहे. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकांची संख्या ५ कोटी ७१ लाखांच्या दरम्यान आहे. या सगळ्यांना लसींचे दोन्ही डोस द्यायचे असतील, तर आपल्याला १२ कोटींच्या दरम्यान लसी लागणार आहेत. त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर जाईल. 

राज्य सरकार लस खरेदी करून लसीकरणासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र महत्त्वाचा प्रश्न हा आहे की इतक्या लसी सध्याच्या घडीला उपलब्ध आहे का? किंवा येत्या दिवसांत तरी एवढा साठा मिळेल का?   

देशातील दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना म्हणजेच कोव्हिशिल्डसाठी सीरमला आणि कोव्हॅक्सिनसाठी भारत बायटेकला आम्ही पत्र लिहिलेली आहेत. परंतु मागील दोन दिवसांपासून त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेलं नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

(maharashtra needs more than 12 crore covid 19 vaccine doses says rajesh tope)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा