Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

केंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल

जवळपास १२ राज्यात तातडीनं अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाचला आहे. यातच अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या ऑक्सिजनची देखील कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे बर्‍याच राज्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतोय.

यादरम्यान, केंद्र सरकारकडून राज्यांशी संपर्क साधला गेला आहे. जवळपास १२ राज्यात तातडीनं अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी १२ राज्यांशी सविस्तर बैठक घेतल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यांच्या गरजांनुसार मॅपिंग केल्याची माहिती दिली आहे. ६ हजार १७७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा वैयक्तिकरीत्या राज्यांना केला जाईल.

कोअर नऊ सेक्टर वगळता इतर सर्व उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा २२ एप्रिलपर्यंत थांबवण्यात आला आहे. जेणेकरुन रुग्णालयांना ऑक्सिजनचे योग्य प्रमाण मिळेल.

पीयूष गोयल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना येण्यापूर्वी भारत दररोज १०००-१२०० मेट्रिक टन ऑक्सिजन वापरत असे, परंतु १५ एप्रिल रोजी ४ हजार ७९५ मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरण्यात आला. देशातील आमचे उत्पादनही लक्षणीय वाढले आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, राज्य सरकारनं वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी नियंत्रित ठेवली पाहिजे. मागणी बाजूचे व्यवस्थापन देखील महत्वाचे आहे, जसं की पुरवठा बाजूचे व्यवस्थापन. कोरोनाचे संकट थांबवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे, त्यांनी ते पाळलं पाहिजे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन पुरवठा केंद्राबाहेर महाराष्ट्रात १ हजार ५०० मेट्रिक टन, दिल्लीला ३५० मेट्रिक टन आणि उत्तर प्रदेशाला ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र, दिल्ली, यूपी, बिहारसह देशातील बर्‍याच राज्यात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे बरीच रुग्णालये रूग्णांची भरती करत नाहीत. काही ठिकाणी रुग्णांनी प्राण गमावले आहेत.हेही वाचा

ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासा

टाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

ठी 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा