Advertisement

कोरोनाच्या लढ्यात साथ, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची अ‍ॅम्ब्युलन्स लाँच

कंपनीनं आपल्या अ‍ॅम्ब्युलन्सची पहिली बॅच खास महाराष्ट्र सरकारसाठी बनवली आहे.

कोरोनाच्या लढ्यात साथ, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची अ‍ॅम्ब्युलन्स लाँच
SHARES

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं बीएस ६ सुप्रो अ‍ॅम्ब्युलन्स लाँच केली आहे. कंपनीनं या अ‍ॅम्ब्युलन्सला आपल्या लोकप्रिय सुप्रो वॅन प्लॅटफॉर्मवर तयार केलं आहे. या अ‍ॅम्ब्युलन्सची मुंबईत एक्स-शोरुम किंमत ६.९४ लाख रुपये आहे. महिंद्रानं या अ‍ॅम्ब्युलन्सला एलएक्स आणि झेडएक्स या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केलं आहे.

कंपनीनं आपल्या अ‍ॅम्ब्युलन्सची पहिली बॅच खास महाराष्ट्र सरकारसाठी बनवली आहे. जेणेकरून कोरोना महामारीशी लढण्यास अ‍ॅम्ब्युलन्सची मदत होईल.

अ‍ॅम्ब्युलन्समध्ये फोल्डेबल स्ट्रेचर आणि ट्रॉली, मेडिकल किट बॉक्स, ऑक्सिजन सिलिंडर, अग्निशामक यंत्र, आग प्रतिरोधक इंटिरिअर आणि घोषणा प्रणाली सारखे फीचर्स आहेत. बाहेरील बाजूस अ‍ॅम्ब्युलन्स एआयएस १२५ प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टीव्ह डिकेल्स, ७५ टक्के फ्रॉस्टेड विंडोज आणि निळा दिवा असलेल्या सायरननं अ‍ॅम्ब्युलन्स सुसज्ज आहे.

अ‍ॅम्ब्युलन्समध्ये महिंद्राचे डीआय इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन ४७ एचपी पॉवर आणि १०० एनएम टॉर्क जनरेट करते. भारतीय रस्त्यांसाठी ही अ‍ॅम्ब्युलन्स उत्तम आहे. ही अ‍ॅम्ब्युलन्स २ वर्ष अथवा ६० हजार किमी वॉरंटीसह येते.


कंपनीनं सांगितलं की, अ‍ॅम्ब्युलन्सची निर्मिती खास आरोग्य सेवेसाठी करण्यात आली आहे. खासकरून जागतिक महामारीच्या लढण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सीईओ विजय नाकरा यांनी सांगितलं की, पहिल्या बॅचमध्ये १२ वाहनांना रेकॉर्ड वेळेत उत्पादन करण्यात आले आणि त्यांची डिलिव्हरी करण्यात आली आहे.



हेही वाचा

'ही' आहे मुंबईतील १७ जूनपर्यंतची कंटेन्मेंट झोन यादी

कोरोनाग्रस्तांसाठी एमएमआरडीएचं दुसरं कोविड सुविधा केंद्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा