Advertisement

वांद्रे विभाग कोरोनाला रोखण्यात मुंबईत अव्वल

एच पूर्व म्हणजे वांद्रे विभागात कोरोनाला रोखण्यात मोठं यश आलं आहे.

वांद्रे विभाग कोरोनाला रोखण्यात मुंबईत अव्वल
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  वरळी, धारावीतील कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता उत्तर मुंबईत कोरोनाचा नवा हाॅटस्पाॅट होत आहे. या पार्श्वभूमीवर एच पूर्व म्हणजे वांद्रे विभागात कोरोनाला रोखण्यात मोठं यश आलं आहे. घरोघरी जाऊन केलेली तपासणी, गरजेनुसार घरीच ऑक्सिजन थेरपी, विलगीकरण आणि प्रतिबंधित क्षेत्रात केलेल्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीमुळे वांद्रे विभाग कोरोनाला रोखण्यात मुंबईत अव्वल ठरला आहे. एच पूर्व विभागाची आठवड्याची सरासरी वाढ ०.९ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तर या ठिकाणचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ७६ दिवसांवर गेला आहे.

 मुंबईतील रोजचा सरासरी रुग्णवाढीचा दर १.९६ टक्के आहे. तर सरासरी रूग्ण दुपटीचा दर ३६ दिवस आहे. त्या तुलनेत वांद्रे विभागाची कामगिरी वाखाण्याजोगी आहे. या विभागात चार टप्प्यांमध्ये काम करण्यात आले आहे. वांद्रे विभागात २३ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला. यानंतर २३ एप्रिलपर्यंत दररोज २० रुग्ण आढळू लागले. यानंतर २४ एप्रिलपासून ड्रोनच्या माध्यमातून विभागावर नजर ठेवून कार्यवाही करण्यात आली.

बेहरामपाडा, भारतनगर, गोळीबार असा दाटीवाटीचा परिसर आरोग्य कर्मचाऱ्यांनी पिंजून काढला. प्रत्येक नागरिकाचे स्क्रीनिंग करण्यात आले. सावर्जनिक शौचालयांचे दिवसातून ५-६ वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये पोलिसांच्या साह्याने संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. यामुळे येथील दैनंदिन रुग्णवाढ २० पर्यंत खाली आली आहे. मे मध्ये दैनंदिन रुग्णवाढ ९५ होती. 

वांद्रे विभागात १८ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. तर १६० ठिकाणी इमारती आणि इमारतींचा भाग प्रतिबंधित केलेला आहे. या क्षेत्रात रहिवासी घराबाहेर पडू नयेत यासाठी पोलिस, पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या एच पूर्व विभागातील एकूण रूग्ण संख्या ३१८२ वर गेली आहे. यामधील २२८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 



हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा