Advertisement

'या' कोरोना सेंटरमधील आयसीयू बाह्यसेवा तत्त्वावर कार्यरत करण्याचा पालिकेचा निर्णय


'या' कोरोना सेंटरमधील आयसीयू बाह्यसेवा तत्त्वावर कार्यरत करण्याचा पालिकेचा निर्णय
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं नागरिकांना चांगले व योग्य उपचार मिळावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. मुंबईच्या विविध भागात हे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. यामधील वांद्रे-कुर्ला संकुलातील कोरोना उपचार केंद्रातील अतिदक्षता विभागाकरिता मनुष्यबळ आणि त्यांचे व्यवस्थापन पुरविण्यासाठी ६ हजार रुपये प्रतिखाटेनुसार खासगी कंपनीला काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेअंतर्गत उभारलेल्या वांद्रे-कुर्ला, मुलुंड, दहिसर, वरळी, गोरेगाव येथील करोना उपचार केंद्रातील ६१२ खाटांचे अतिदक्षता विभाग बाह्यसेवा तत्त्वावर कार्यरत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, कोरोना उपचारासाठी पालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयाच्या संघटनेने यावर आक्षेप नोंदविला.

महापालिककेनं यासाठी इच्छुक खासगी संस्थांकडून अर्ज मागविले होते. यातून ३ संस्थांची निवड पालिकेनं केली. यातील सर्वात कमी दर प्रस्तावित केलेल्या ‘कार्डियाक केअर’ कंपनीला वांद्रे- कुर्ला येथील ११२ खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या व्यवस्थापनाचे काम देण्यात आले आहे. यासाठी ६ हजार रुपये प्रतिखाट हा दर ठरविण्यात आला आहे.

अन्य कंपन्यांनी याहून अधिक दर प्रस्तावित केले आहेत. हे दर कमी करण्याकरिता चर्चा सुरू असल्याचे समजतं. कोरोना उपचारासाठी महापालिकेने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयाच्या संघटनेने मात्र यावर आक्षेप नोंदविला आहे. या खाटांकरिता केवळ मनुष्यबळ पुरविणाऱ्या या संस्थांना पालिका ६ हजार देणार आहे. मात्र जागेसह वैद्यकीय साहित्य, औषधे यांचा खर्च पालिकेची जबाबदारी असेल. त्यासाठी केवळ ३ हजार देण्यात येणार आहे.



हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा