प्रसूती रजेत वाढ

 Mumbai
प्रसूती रजेत वाढ

मुंबई - महिलांना आता 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. लोकसभेत आवाजी मतदानाने प्रसूती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या आधी महिलांना 12 आठवडे प्रसूती रजा मिळत होती. पण आता 26 आठवडे रजा भरपगारी असणार आहे. प्रसूती रजा विधेयक या आधी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते.

प्रसूती आणि त्यानंतर अपत्याच्या पालनपोषणासाठी दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करण्यात आली आहे. प्रसूती रजा साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. कॅनडा नॉर्वेनंतर महिला कर्मचाऱ्यांना इतकी मोठी प्रसूती रजा देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.

Loading Comments