मुंबई भाजली जातेय!

  Mumbai
  मुंबई भाजली जातेय!
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून पाराही चढत आहे. मंगळवारी कुलाब्यात 32.2 तर सांताक्रुझमध्ये 35.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. तर पुढचे दोन ते तीन दिवस पारा असाच चढलेला असेल. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना केले.

  रविवारपासून पारा वाढत चालला असून सोमवारी तापमानाने चांगलाच उच्चांक गाठला. सोमवारी मुंबईचा पारा चक्क 38 अंश सेल्सिअसवर पोहोचला. या आधी 2011 मध्ये 17 मार्चला 41.2 अंश सेल्सिअस तपामान नोंदवले गेले होते. तर, बरोबर साठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 28 मार्च 1956 ला मुंबईतील तापमान 41.7 अंश सेल्सिअसवर गेले होते आणि हे मुंबईतील सर्वाधिक तपामान होते, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. जमिनीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव या दिवसांत जास्त असल्याने उन्हाचा तडाखा वाढत असून पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा वाढलेलाच असेल असेही राजीव यांनी स्पष्ट केले आहे.

  शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने जास्तीत जास्त पाणी, त्यातही लिंबू-पाण्याचे सेवन अधिक प्रमाणात करावे, असा सल्ला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नियुक्त सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिला आहे. तर लहान मुलांनी कमीत कमी दीड ते दोन लिटर पाणी प्यावे आणि प्रौढांनी किमान साडेतीन लिटर पाणी उन्हाळ्यात प्यावे, असेही त्यांना सांगितले आहे.

  उन्बाळ्यात काय काळजी घ्याल?

  • भरपूर पाणी प्या
  • ग्लुकॉन-डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर जवळ बाळगा
  • उन्हातून आल्यानंतर गूळ-पाणी प्या
  • उसाचा रस, लिंबू पाणी प्या
  • नारळपाणी आणि ताकाचे नियमित सेवन करा
  • चहा, कॉफी टाळा
  • हलक्या रंगाचे, सुती कपडे वापरा
  • उन्हातून आल्याबरोबर गार पाणी पिऊ नये
  • रोज एक चमचा गुलकंद खा
  • उन्हातून आल्याबरोबर लगेच कुलर वा एसीमध्ये जाऊन बसू नये
  • सनस्क्रीन लावूनच घराबाहेर पडा
  • बाहेर पडताना कॉटनचा रेनकोट आणि शक्य असल्यास ग्लोव्हज घाला
  • रात्री झोपताना पायाला तेल लावून मजास करा
  • रस्त्यावरील खाणे टाळा
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.