Advertisement

८ महिन्यांच्या गरोदर असताना बनवलं कोरोना चाचणीचं किट

हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सँपल घेऊन घरच्या घरीच कोरोनाची चाचणी करता येणार आहे.

८ महिन्यांच्या गरोदर असताना बनवलं कोरोना चाचणीचं किट
SHARES

आता घरबसल्या कोरोनाची चाचणी करता येणार आहे. पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेडने होम आयसोलेशन टेस्टिंग किट तयार केलं आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआरने) घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी माय लॅबच्या होम सेल्फ किटला मंजुरी दिली आहे. हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सँपल घेऊन घरच्या घरीच कोरोनाची चाचणी करता येणार आहे. 

पुण्यातील माय लॅबमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या किटचं डिझाईन तयार केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे किट तयार करताना त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. पुण्यातील एनआयव्ही या संस्थेत १८  मार्च २०२० रोजी किटची पहिली चाचणी घेण्यात आली. दुसऱ्याच दिवशी १९ मार्च रोजी मीनल यांनी मुलीला जन्म दिला.  २३ मार्च २०२० रोजी त्यांनी अन् त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली. 

या टेस्ट किटची किंमत २५० रुपये ठेवण्यात आली आहे. या किटद्वारे १५ मिनिटांत रिझल्ट येणार आहे. कोरोना टेस्ट आपल्या घरी कोण करू शकतात याच्या मार्गदर्शक सूचना आयसीएमआरने जारी केल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना 

- घरच्या घरी स्वत:च करण्यासाठी किट आणि अॅप आवश्यक

-  होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी आहे.

-  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक चाचणी करू शकतात

- होम टेस्टिंग किटने ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने होईल.

- यासाठी गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन अॅप डाउनलोड करावा लागेल.

- मोबाइल अॅपवरुन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.

कशी करायची चाचणी?

- कोविसेल्फ नावाच्या या किटद्वारा नाकातून सँपल घ्यावे लागेल.

- होम टेस्टिंग करणाऱ्याला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.

- हा फोटो आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.

- यानंतर तो व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे समजेल.

- पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनसाठी आयसीएमआर आणि आरोग्य 

-  मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.

- लक्षणं असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना आरटी-पीसाआर चाचणी करावी लागेल.



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा