Advertisement

'मिशन इंद्रधनुष' अंतर्गत 7 ऑक्टोबर पासून लसीकरण मोहीम


'मिशन इंद्रधनुष' अंतर्गत 7 ऑक्टोबर पासून लसीकरण मोहीम
SHARES

राज्यातील 9 जिल्हे आणि 13 महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 7 ऑक्टोबरपासून 'मिशन इंद्रधनुष्य' योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे.

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नयेत, तसंच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी केलं आहे.

'मिशन इंद्रधनुष्य' मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एक बैठक झाली. यावेळी मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी, तसेच महापालिका आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला.

राज्यात 9 जिल्हे आणि 13 महापालिका क्षेत्रात 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यांपर्यंत 'मिशन इंद्रधनुष्य'अंतर्गत 0 ते 2 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये गृहभेटी देऊन बालकांना करण्यात आलेल्या लसीकरणाबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. ते येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले आहेत.


या क्षेत्रात राबवणार मोहीम

नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, बीड, नांदेड, सोलापूर, जळगाव, ठाणे, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच मालेगाव, जळगाव, ठाणे, उल्हासनगर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा भाइंदर, सोलापूर, नांदेड या 13 महापालिका क्षेत्रांमध्ये ही मोहीम घेण्यात येणार आहे.

ज्या महापालिका क्षेत्रात लसीकरणासंबंधी बालकांचा सर्वे अद्याप पूर्ण झालेला नाही, तो तातडीने पूर्ण करावा. भिवंडी, मालेगाव या भागांमध्ये लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळण्याकरता नगरसेवक तसेच मौलवींची भेट घेऊन त्यांना सहभागी करून घ्यावे. यासाठी जाणीव जागृतीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावा. लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारांमुळे बालमृत्यू होऊ नये, यासाठी इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.


दर महिन्याच्या 7 तारखेला राबवणार मोहीम

7 ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू होणार असून दर महिन्याच्या 7 तारखेला ही मोहीम आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर महिन्याभरात सात दिवस ही लसीकरणाची मोहीम सुरू असणार आहे. शहरातील झोपडपट्टी भागात यावर विशेष भर देण्यात येणार आहे. शहरांमध्ये विभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून मोहिमेत 0 ते 2 वयोगटातील बालकांना, तसेच गर्भवती महिलांना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. बालकांची संख्या आणि त्यांना लागणारी लस यासाठी सर्वे केला जात आहे.



हेही वाचा

मुंबईत स्वाईन फ्लूमध्ये अतीजोखमीचे 60 टक्के रुग्ण

महापालिकेचं 'मिशन इंद्रधनुष्य'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा