Advertisement

विकेंडला जुहू बीच बंद करावा, भाजपा आमदाराची मागणी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, महाराष्ट्र आता संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या मार्गावर आहे.

विकेंडला जुहू बीच बंद करावा, भाजपा आमदाराची मागणी
File image
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार अमित साटम यांनी शहरातील लोकप्रिय जुहू बीच आठवड्याच्या शेवटी बंद ठेवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पालिकेला पत्र लिहले आहे.

अमित साटम यांनी पालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका) आयुक्त इकबालसिंग चहल यांना पत्र लिहून सांगितलं की, मुंबईतील कोरोनाव्हायरसचे वाढते रुग्ण पाहता समुद्रकिनारा शुक्रवार ते रविवारी संध्याकाळी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात यावा.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, महाराष्ट्र आता संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या मार्गावर आहे.

COVID 19 साथीच्या आजाराच्या दुसर्‍या लाटेच्या तोंडावर महाराष्ट्र आहे. "रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधणं, त्यांची चाचणी करणं यासाठी खूपच मर्यादित सक्रिय प्रयत्न आहेत," असं अहवालात म्हटलं आहे.

या अहवालात जिल्हा प्रशासनाची उदासिन वृत्ती स्पष्ट करण्यात आली आहे. आठवड्याचे शेवटचे दिवस सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. कोणतेही सामाजिक अंतर न मानता पर्यटक समुद्रकिनारी किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत.

राज्य प्राधिकरणानं अलीकडेच ३१ मार्चपर्यंत या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध जाहीर केले आहेत. हे नियम गेल्या वर्षी लॉकडाउनइतके गंभीर नसले तरी हॉटेल, मल्टिप्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट्स इत्यादी आता फक्त ५० टक्के क्षमतेवर चालण्याची परवानगी आहे.

जुहू बीच बंद करण्याबाबत, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवार आणि रविवार दरम्यान ते विभाग बंद करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांची प्रतीक्षा करतील. त्यांनी असंही म्हटलं आहे की, सद्यस्थितीत कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय मेळाव्यास परवानगी नाही.



हेही वाचा

चेंबूर, वांद्र्यातील कोरोनाची आकडेवारी सप्टेंबर-ऑक्टोबरपेक्षा खराब

महाराष्ट्रातील 'या' शहरांमध्ये कोविडचा आकडा सर्वाधिक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा