Advertisement

६ महिन्यांत २० बोगस डॉक्टरांवर कारवाई

बोगस डाॅक्टरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 'एमएमसी' कडे नोंदणी केल्याचं तपासात निष्पण्ण झाल्याने 'एमएमसी'ने ६ महिन्यांमध्ये २० डाॅक्टरांचा परवाना रद्द केला आहे. तसंच रुग्णांच्या मेडिकल रिपोर्टवर बनावट सही केल्याप्रकरणी ४ पॅथॉलॉजिस्टचंही निलंबन करण्यात आलं आहे. सध्या वैद्यकीय

६ महिन्यांत २० बोगस डॉक्टरांवर कारवाई
SHARES

सध्या मुंबईसह राज्यभर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. हा सुळसुळाट थांबवण्यासाठी 'महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिल' (एमएमसी)ने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील २० डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, अजून ७० ते १०० बोगस डाॅक्टरांवर 'एमएमसी'ची नजर असल्याचं 'एमएमसी'चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितलं.


'अशी' केली कारवाई

बोगस डाॅक्टरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 'एमएमसी' कडे नोंदणी केल्याचं तपासात निष्पण्ण झाल्याने 'एमएमसी'ने ६ महिन्यांमध्ये २० डाॅक्टरांचा परवाना रद्द केला आहे. तसंच रुग्णांच्या मेडिकल रिपोर्टवर बनावट सही केल्याप्रकरणी ४ पॅथॉलॉजिस्टचंही निलंबन करण्यात आलं आहे.

सध्या वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय प्रमाणपत्र नसूनही बोगस डॉक्टर आपापले क्लिनिक्स थाटतात. यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे अशा बोगस डाॅक्टरांविरोधात 'एमएमसी'ने राज्यातील डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी सुरू केली होती. याच तपासणीत हे २० डाॅक्टर अडकले आहेत.


६५० प्रकरणे निकाली

या २० बोगस डाॅक्टरांमध्ये मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील २ डॉक्टरांचा समावेश आहे. अजूनही जवळपास ७० ते १०० डॉक्टरांवर आमची नजर आहे. उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गेल्या ५ वर्षांत आमच्याकडे १४०० तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ६५० प्रकरणं निकाली काढण्यात आल्याचं डॉ. उत्तुरे यांनी स्पष्ट केलं.


बोगस पॅथॉलॉजिस्टवरही कारवाई

'एमएमसी'मध्ये नोंदणी असलेल्या डॉक्टरांनाच प्रयोगशाळांच्या रिपोर्टवर सही करण्याचा अधिकार आहे. पण, अनेकदा योग्य पॅथोलॉजिस्टच्या जागी प्रयोगशाळांमध्ये काम करणारे तंत्रज्ञ रुग्णांच्या वैद्यकीय चाचणी अहवालावर सही करतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. जे डॉक्टर एका लॅब काम न करता अनेक लॅबमध्ये काम करतात, अशा ४ पॅथॉलॉजिस्टवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.



हेही वाचा-

डाॅक्टरांनो, रूग्णांना अधिकृत पॅथाॅलाॅजी लॅबमध्येच पाठवा, नाही तर याल गोत्यात...

बोगस डाॅक्टरची 'अशी'ही रुग्णसेवा? क्लिनिकच्या बंद दाराआड चालवायचा वेश्याव्यवसाय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा