Advertisement

झोपडपट्टी नाही तर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये फोफावतोय कोरोना, जाणून घ्या कारण

झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या भागापेक्षा अधिक रुग्ण उच्चभ्रू वस्तीत आढळत आहेत. जाणून घ्या याचं कारण

झोपडपट्टी नाही तर उच्चभ्रू वस्त्यांमध्ये फोफावतोय कोरोना, जाणून घ्या कारण
SHARES

शहरात बहुतेक कोविड रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत. यातील बहुतेक नागरिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाली होती किंवा पर्यटनस्थळांवर फिरायला गेली होती, अशी माहिती पालिकेनं दिली आहेत. रविवारी, शहरात एकूण कोविडचे रुग्ण ७ लाख ३४ हजार ११८ इतकी नोंदवली गेली. गेल्या दहा दिवसांपासून मुंबईत रोजचा कोरोनाचा आकडा ५०० च्या खाली गेला आहे.

प्रशासकिय अधिकाऱ्यांना असं आढळलं आहे की, झोपडपट्टी किंवा इतर दाट लोकवस्ती असलेल्या भागात फारच कमी रुग्ण आढळत आहेत. अतिरिक्त नगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, के-वेस्ट (अंधेरी-पश्चिम, विलेपार्ले, जुहू), एच-वेस्ट (वांद्रे, खार), एस (विक्रोळी, भांडुप) आणि आर-सेंट्रल (बोरिवली) अशा प्रभागांमध्ये रुग्ण संख्या अधिक आहे.

“आम्हाला आढळलं की लोक एकतर सामाजिक कार्यक्रमात गेले होते किंवा लोणावळ्यासारख्या ठिकाणी गेले होते. सध्या तरी मुंबईमध्ये रुग्णांची आकडेवारी सामान्य आहे. त्यामुळे ल़कडाऊन उडण्याची मागणी जोर धरत आहे. तरीही आम्ही राज्याच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत,” असं सुरेश काकणी म्हणाले.

दरम्यान, रविवारी मुंबईत ५३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. झोपडपट्टीतील संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, रविवारच्या आकडेवारीनुसार, शहरात ३ चाळी आणि ६१ इमारती प्रतिबंधित आहेत.

मुंबईत पाचवे सेरो सर्वेक्षण सुरू झाले असून, त्यात शहरातील सुमारे आठ ते दहा हजार व्यक्तींचे नमुने घेण्यात येणार आहेत. राज्यात ६,८४३ नवे रुग्ण मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६,८४३ रुग्ण आढळले असून, १२९ रुग्णांचा मृत्यू झाला.



हेही वाचा

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी

लसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा