Advertisement

मुलुंडच्या ऑक्टरॉय इमारतीचा COVID 19 केअर सेंटर म्हणून वापर

मुलुंडच्या ऑक्टरॉय नाका इथली प्रशासकीय इमारत COVID 19 केअर सेंटर २ म्हणून ताब्यात घेतली आहे.

मुलुंडच्या ऑक्टरॉय इमारतीचा COVID 19 केअर सेंटर म्हणून वापर
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) मुलुंडच्या ऑक्टराय नाका इथली प्रशासकीय इमारत COVID 19 केअर सेंटर २ म्हणून ताब्यात घेतली आहे. या केअर सेंटरमध्ये टी वॉर्डमधल्या रुग्णांना दाखल करता येईल. टी वॉर्ड हा सर्वात लहान वॉर्डपैकी एक आहे. टी वॉर्डमध्ये एका आठवड्यात म्हणजे ११ मे ला २१३ रुग्णांची नोंद झाली. तर १८ मेला हा आकडा ४१३ च्या घरात हा आकडा गेला. जवळपास ९० टक्क्यांची वाढ झाली आहे.

प्रभाग अधिकारी किशोर गांधी यांच्या मते ही सुविधा सौम्य लक्षणे आणि रोगनिवारक रूग्णांसाठी ठेवली जात आहे. आतापर्यंत ११५  बेड ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी आठ बेड्सना ऑक्सिजन लाईन आहे. याशिवाय ४० खाटा तळ मजल्यावर ठेवल्या जातील. रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच ही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे.

दरम्यान, असं म्हटलं जातं की, स्लम भाग असल्यामुळे इथं कोरोनाव्हायरसचा अधिक फैलाव झाला आहे. याखेरीज, एपीएमसीतील विविध बाजारपेठेतील व्यापारी देखील याच भागात राहतात. ते देखील त्यांच्या कुटुंबियांसह संक्रमित झाले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील काही कर्मचारी, जे मुलुंडचे रहिवासी आहेत आणि क्लिअरिंग एजंट म्हणून काम करतात त्यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

१८ मे २०२० पर्यंत मुलुंडमधील कंटेनमेंट झोन किंवा रेड झोन म्हणून १५ भागांना सीलबंद करण्यात आलं आहे.

हे परिसर केले सील :

  • इंदिरा नगर - १, मुलुंड पश्चिम
  • इंदिरा नगर - २, मुलुंड पश्चिम
  • इंदिरा नगर - ३, मुलुंड पश्चिम
  • अमर नगर, मुलुंड पश्चिम
  • रामगड, गोसाला रोड, मुलुंड पश्चिम
  • विजय नगर, मुलुंड पश्चिम
  • न्यू राहुल नगर, मुलुंड पश्चिम
  • अशोक नगर, हनुमान मंदिरजवळ
  • बाबू जगजीवन राम नगर, मुलुंड पश्चिम
  • गवनी पाडा, नाहूर रोड
  • वीर संभाजी नगर
  • आझाद नगर, मुलुंड पश्चिम
  • शंकर टेकडी, मुलुंड पश्चिम
  • इंदिरा कॉलनी, मुलुंड पश्चिम
  • वैशाली सोसायटी, मुलुंड पश्चिम

यापैकी सर्वात जास्त प्रकरणे इंदिरा नगर - २ त्यानंतर रामगड (गोसाला रोड) आणि अमर नगर इथं आढळून आली आहेत. ज्यात सध्या अनुक्रमे ६२, ४३ आणि २६ प्रकरणं समोर आली आहेत.



हेही वाचा

Coronavirus: मुंबईत कोरोनाचे 1372 नवे रुग्ण, दिवसभरात 41 जणांचा मृत्यू

कोरोनाचा हाहाकार! राज्यात दिवसभरात 65 जणांचा मृत्यू, तर 2250 नवे रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा