Advertisement

मास्क वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक

भारतात मास्कच्या वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागतोय.

मास्क वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक
SHARES

भारतात मास्कच्या वापरात मुंबई शहराचा प्रथम क्रमांक लागतोय. मुंबईतील ७६.२८ टक्के लोक हे मास्कचा वापर करतात. तर पुण्यातील ३३.६० टक्के लोक मास्कचा वापर करतात असं डिजिटल इंडिया फाऊंडेशनच्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

डिजिटल इंडिया फाऊंडेशननं देशातील मास्कच्या वापरावर एक सर्वेक्षण केलं आहे. देशातल्या ११ शहरांमध्ये २७ दिवस हे सर्वेक्षण झालं. २३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ९११ जणांच्या मुलाखती झाल्या आणि त्यानंतर ११ शहरांमधल्या मास्क वापरणाऱ्यांची आकडेवारी समोर आली.

यामध्यमे मुंबईत सर्वात जास्त लोक मास्कचा वापर करत असून त्याचं प्रमाण हे ७६.२८ टक्के इतकं आहे. तर अर्धवट मास्क न घातलेल्या लोकांचं प्रमाण हे १७.५७ टक्के इतकं आहे. मुंबईत ६.१५ टक्के लोक मास्कचा वापर करत नाहीत असं या अहवालातून समोर समोर आलं आहे.

रुग्ण संख्येत दुसऱ्या स्थानावर असलेली दिल्ली मास्क लावण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर आहे. तर पुणे दहाव्या स्थानावर आहे.

सध्या देशात रुग्णवाढ सर्वात जास्त वेगानं होतेय. गेल्या २४ तासांमध्ये लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद झालीय. हाच आकडा पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत लसीकरणाबरोबरच मास्क लावणं आवश्यक आहे.



हेही वाचा

धारावीतील बोगस लसीकरण सर्टिफिकेट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी गाईडलाईन्स जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा