Advertisement

कोरोनासाठीच्या 'या' जीवनावश्यक गोळ्यांचा तुटवडा

मुंबईलाही कोरोनात देण्यात येणाऱ्या या औषधांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोरोनासाठीच्या 'या' जीवनावश्यक गोळ्यांचा तुटवडा
SHARES

बंगळुरू आणि दिल्लीसह भारतातील इतर शहरांप्रमाणेच मुंबईलाही रेमेडिसिव्हिर आणि टोकिलीझुमाबसारख्या औषधांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. एका अहवालातून हे समोर आलं आहे. 

मुंबईतील रुग्णालयांना औषधं थेट निर्मात्यांकडून मिळतात. याव्यतिरिक्त, शहरातील दोन स्वतंत्र वितरक, एस के डिस्ट्रिब्यूटर्स आणि भायखळा फार्मसी आणि स्टोअर्स देखील निर्मात्यांकडून औषधांचा पुरवठा करतात.

ग्राउंड रिपोर्ट्सनुसार भायखळा फार्मसी अँड स्टोअर्समधील रॅमेडेव्हिव्हिर आणि तोसिलिझुमाबचा साठा ५ जुलै रोजी संपला होता. तर एस के डिस्ट्रिब्यूटर्सकडील साठा देखील शिल्लक नव्हता. औषध निर्माता सिप्ला यांनी असं म्हटलं आहे की, या आठवड्याच्या अखेरीस साठा पुन्हा भरला जाईल.


हेही वाचा : Corona Infected Police वेदनादायक! आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू, आकडे चिंता वाढवणारे


इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पार्थिव संघवी यांनी यातील वास्तवांबद्दल भाष्य केलं. मिरर नाऊशी बोलताना डॉ. संघवी म्हणाले की, “ही औषधं आता आयसीएमआरकडून मंजूर झाल्यानंतर ट्रीटमेंट प्रोटोकॉलचा एक भाग बनतात. परंतु आता समस्या अशी आहे की ही औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. दुर्दैवानं, रुग्ण वाढले आहेत आणि या वाढीव संख्येसाठी आम्हाला योग्य पुरवठा आवश्यक आहे. या औषधांचा तुटवडा या उपचारास बाधा आणेल आणि म्हणूनच सरकारनं आता या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा. "

सिप्ला द्वारा रिमडॅझिव्हिर बनवलं जातं आणि विकलं जातं. तर टोकलिझुमब हे औषध रोचे यांनी निर्मित केलं असून सिप्लाद्वारे भारतात आयात केलं जातं. आता ही औषधं १० जुलैपर्यंत वितरक आणि रुग्णालयात पोहोचतील अशी अपेक्षा आहे.हेही वाचा

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक

मुंबईत कोरोनाचे १३८१ नवे रुग्ण, ६२ जणांचा दिवसभरात मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा