Advertisement

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

दिवाळीनंतर कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल आणि हिवाळ्यातील थंडीमुळे परिस्थिती आणखी तीव्र होईल, असं मत तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलं आहे.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता
SHARES

बऱ्याच देशात कोरोनाव्हायरसमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बरेच देश अद्याप कोरोनाशी दोन हात करत आहेत. आता जगभरात संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. असं असलं तरी आपल्याला निष्काळजीपणा दाखवता येणार नाही.

दिवाळीनंतर कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल आणि हिवाळ्यातील थंडीमुळे परिस्थिती आणखी तीव्र होईल, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. शिवाय, जर दुसरी लाट येत असेल तर ते हृदयविकारातील रुग्णांसाठी अधिक धोकादायक ठरेल. कारण एका मोठ्या अभ्यासानुसार, जगभरातील संशोधकांना असं आढळलं आहे की, रूग्णांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी असलेल्या आजारांमुळे अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

नेरूळ इथले शुश्रुषा हार्ट केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि हृदय तज्ज्ञ डॉ. संजय तारलेकर म्हणाले की, “हिवाळा हा थंडी आणि तापाचा हंगाम मानला जातो. कोरोना संसर्गातही ताप आणि थंडी वाजते. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडासा संभ्रम निर्माण होईल. म्हणून नागरिकांनी हिवाळ्यात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) हिवाळ्यात कोरोना आणि हृदयविकाराच्या दुसर्‍या लाटेचा अंदाज वर्तवित आहे. हे लक्षात घेऊन, मी भारतातील नागरिकांना, विशेषत: हिवाळ्याच्या तीव्र भागात राहणाऱ्या लोकांना, दारू आणि धूम्रपान टाळण्यासाठी आवाहन करू इच्छित आहे.

अधिक थंड ठिकाणी राहणाऱ्यांनी गरम राहण्यासाठी उबदार कपडे घालावे. हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब ग्रस्त लोकांनी हिवाळ्यात अत्यधिक शारीरिक हालचाली टाळाव्या. ज्या नागरिकांची हृदय शस्त्रक्रिया झाली आहे किंवा ज्या नागरिकांना हृदयाची समस्या आहे त्यांनी सर्व आवश्यक हृदय तपासणी करून घ्याव्यात. हिवाळ्यात रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणं देखील महत्त्वाचं आहे."

मुलुंडच्या अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे ज्येष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. मयूर जैन म्हणाले, “देशभरात थंडीमध्ये विषाणूचा प्रसार कसा होईल याविषयी कोणतेही वैद्यकीय निष्कर्ष काढलेला नाही. पावसाळ्यात सार्वजनिक वाहतूक बंद होती, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होती.

पण आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात सर्व मुख्य बाजारपेठा आणि भाजीपाला बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदय रोग असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. दिवाळी खरेदीसाठी जाताना फेस मास्क घालणं, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवणं आणि बाहेरून घरी आल्यावर आपले हात धुणं देखील महत्त्वाचं आहे.”



हेही वाचा

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

कोरोनावर मात करण्यासाठी बीएमसीला १ हजार कोटींचा खर्च

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा