Advertisement

मुंबई, पुण्यात मद्यविक्री नाहीच, एका दिवसाने निर्णय पुढं ढकलला

घरपोच मद्यविक्रीचा (home delivery of liquor) निर्णय एका दिवसाने पुढं ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय मुंबई, पुण्यासहित औरंगाबादमध्ये हा निर्णय लागू होणार नसल्याने मद्यप्रेमींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

मुंबई, पुण्यात मद्यविक्री नाहीच, एका दिवसाने निर्णय पुढं ढकलला
SHARES

घरपोच मद्यविक्रीचा (home delivery of liquor) निर्णय एका दिवसाने पुढं ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय मुंबई, पुण्यासहित औरंगाबादमध्ये (red zone mumbai and pune) हा निर्णय लागू होणार नसल्याने मद्यप्रेमींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार गुरुवार १४ मे सकाळी १० वाजल्यापासून ही सेवा सुरु होणार होती.

राज्य सरकारच्या गृहविभागाने (home ministry) ११ मे २०२० रोजी परिपत्रक काढत १४ मे सकाळी १० वाजल्यापासून मद्याची घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली होती. मद्यविक्रीचा परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येईल, तर ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येईल, असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं.  

हेही वाचा- आता घरपोच मिळेल दारू, होम डिलिव्हरीला सरकारची परवानगी

अटी-शर्ती पुढीलप्रमाणे:

  • जो अनुज्ञप्तीधारक भारतीय बनावटीचं विदेशी मद्य-स्पिरिट्स, बीअर, सौम्य मद्य, वाईन या प्रकाराची विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करतो, केवळ त्या मद्य प्रकाराची विक्री करेल.
  • विहीत केलेल्या दिवशी व वेळेत अनुज्ञप्तीधारक विदेशी मद्याची विक्री व वितरण केवळ त्याच्या अनुज्ञप्ती आवारातून करेल.
  • परवानाधारकाने संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली तरच परवानाधारकास अशा मद्याचं वितरण अनुज्ञेय मद्याचं परवानाधारकाच्या निवासी पत्त्यावर करता येईल.
  • अशा मद्याच्या विक्रीकरीता घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक केली जाईल, त्या व्यक्ती मास्कचा वापर व वेळोवळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करतील, याची दक्षता अनुज्ञप्तीधारक घेईल.
  • राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ (२००५ चा ५३ वा कायदा) किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले लाॅकडाऊनचे आदेश अस्तीत्वात असेपर्यंत हे आदेश लागू वा अस्तीत्वात राहतील. 
  • शासन स्वेच्छेने कधीही सदरचे आदेश सुधारीत किंवा रद्द करू शकेल.

मात्र, हा निर्णय एका दिवसाने पुढं ढकलण्यात आला आहे.

त्याशिवाय कंटेन्मेंट तसंच रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नाही. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद यांसारख्या रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नाही. ज्या जिल्ह्यात दुकानं उघडी आहेत तिथेच ही सेवा लागू होणार आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत काही वेगळा निर्णय घेतला तर त्याठिकाणी ही सेवा सुरु करता येईल. या आदेशात बदल करण्याचा किंवा तो मागे घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना अजून काही काळ दारूसाठी वाट बघावी लागणार आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा