Advertisement

केईएमच्या डॉक्टरांना डेंग्यूची लागण


केईएमच्या डॉक्टरांना डेंग्यूची लागण
SHARES

मुंबईत सध्या साथीच्या आजारांचं प्रमाण वाढत आहे. या साथीच्या आजारांच्या विळख्यात सर्वसामान्यांप्रमाणे आता डॉक्टरही अडकू लागले आहेत. परळ येथील केईएम रुग्णालयातील काही निवासी डॉक्टरांना गेल्या महिन्यात डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मेडिसीन आणि सर्जरी विभागातील निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यात एका इंटर्न मुलीचा देखील समावेश होता.


गेल्या महिन्यात ३ ते ४ डॉक्टर डेंग्यूच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यात एका इंटर्न मुलीचा समावेश होता. पण, आता त्यांची प्रकृती ठिक आहे. हे डॉक्टर गावातून येतात. फक्त रुग्णालयात राहूनच त्यांना डेंग्यूची लागण झाली पाहिजे असं काही नाही. आम्ही पुन्हा कोणाला डेंग्यूची लागण होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत.

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


मी यासंदर्भात केईएम रुग्णालयात विचारणा केल्यावर तशी कुठलीही माहिती मिळाली नाही. पण, तरीही केईएम, वाडिया किंवा केईएमची सीबीटीसी बिल्डिंग इथे डासांच्या अळ्या शोधण्यासाठी कर्मचारी नेमले आहेत. जूनपासून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. दररोज एक क्लिनिकल टीम, काही इंजिनिअर्स या जागेची पाहणी करतात. 

- राजन नारिंगेकर , कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी


डेंग्यूची लक्षणे साथीच्या आजारांसारखी दिसून येतात. त्यामुळे डॉक्टरांना नेमका डेंग्यूच झाला आहे, असं अजून तरी स्पष्ट झालेलं नाही, असं राजन नारिंगेकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना माहिती दिली आहे.


आम्ही गेल्या महिन्यापासून डेंग्यूपासून बचावासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे. रुग्णालय परिसरात आम्ही स्वच्छता अभियान राबवले आहेत. डॉक्टरांना किटकप्रतिबंधक औषधांचा वापर करण्यापासून खिडक्या बंद करण्यापर्यंत सर्व सूचना आम्ही दिलेल्या आहेत. 

- डॉ. राजेश कटरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना


डेंग्यूचा किंवा कोणत्याही संसर्गजन्य आजारांची डॉक्टरांना लागण होऊ नये म्हणून पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे, रुमच्या खिडक्या बंद कराव्या, रुममध्ये मच्छरदाण्यांचा वापर करावा, त्वचेला त्रास होणार नाही अशा किटकप्रतिबंधक औषधांचा वापर करावा, रुग्णालय परिसरात कुठल्याच ठिकाणी पाणी साचून राहू नये याची काळजी घ्यावी, असे निर्देशही डॉक्टरांना देण्यात आले आहेत.



हेही वाचा -

डेंग्यू, मलेरिया आजारांच्या माहितीसाठी वापरा हे अॅप



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा