Advertisement

डेंग्यू, मलेरिया आजारांच्या माहितीसाठी वापरा हे अॅप


डेंग्यू, मलेरिया आजारांच्या माहितीसाठी वापरा हे अॅप
SHARES

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात आजार वाढले आहेत. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. पण, तरीही हे आजार किंवा साथीचे रोग कमी व्हायचं नाव घेत नाही. याच पार्श्वभूमीवर रुग्णांना या आजारांबद्दलची माहिती लगेच उपलब्ध व्हावी यासाठी ‘मॉन्सून रिलेटेड डिसीस’ नावाचं एक अॅप तयार करण्यात आलं आहे. वाढत्या आजारांना गांभीर्याने घेत हे पाऊल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलं आहे.


अॅपमध्ये उपलब्ध असणारी माहिती

या अॅपमध्ये पावसाळी आजारांबद्दलची सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आजार होऊ नये म्हणून काय करावं, आजार झाला तर काय करावं. शिवाय, महापालिका क्षेत्रात पालिका दवाखाने, त्यासोबत रुग्णालयांचे पत्ते, संपर्क क्रमांक ही माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अॅपचे उद्घाटन महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात येणार आहे.


यांच्या सहकार्याने केलं अॅप तयार

महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील सामुदायिक औषध विभाग आणि कांदिवली परिसरातील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या पुढाकाराने हे अॅप तयार करण्यात आलं आहे.


डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया यांसारख्या आजारांबद्दल इंटरनेटवर सहज माहिती उपलब्ध होऊ शकते. पण, ती माहिती किती खरी किंवा ती शास्त्रशुद्ध असेलच असं नाही. त्यामुळे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी या आजारांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती या अॅपमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. प्रसार रोखण्यापासून आजारात काय काळजी घ्यावी, अशी संपूर्ण माहिती या अॅपमध्ये उपलब्ध असणार आहे. 

- डॉ. सीमा बनसोडे, प्राध्यापक



अॅप डाऊनलोड करण्यासाठी काय कराल?

‘मॉन्सून रिलेटेड डिसीस’या नावाचं अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करुन इन्स्टॉल करता येणार आहे. त्यात काय करावे आणि काय करावे अशी सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा