हायकोर्टाचे डॉक्टर्सना खडे बोल

  Mumbai
  हायकोर्टाचे डॉक्टर्सना खडे बोल
  मुंबई  -  

  मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांना दम दिल्यानंतर हायकोर्टानेही डॉक्टरांना फटकारले आहे. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही डॉक्टर्स कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे न्यायाधीशांनी संताप व्यक्त केला. "कालपर्यंत आमच्या मनात सहानुभूती होती. पण आता ती सहानुभूती राहिली नाही. आश्वासन देऊनही तुम्ही कामावर रुजू झाला नाहीत. त्यामुळे यापुढे राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी तुम्ही तयार रहा," असा इशारा हायकोर्टाने दिला.

  "डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय रुग्णालयांनी घ्यावा. डॉक्टरांवर कारवाई करण्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने हाटकोर्टात सादर करावे. मार्डने दुपारी 3 वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे," असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. प्रतित्रापत्र सादर न केल्यास मार्डच्या अध्यक्ष आणि सचिवांवर कारवाई करू असा इशाराही हायकोर्टाने दिला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.