Advertisement

महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणतीही लक्षणे नसल्यानं त्या होम क्वारंटाइन झाल्या आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोणतीही लक्षणे नसल्यानं त्या होम क्वारंटाइन झाल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. 

ट्वीटमध्ये किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी कोविड अँटिजन चाचणी करुन घेतली. ती सकारात्मक आली. कोणतीही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलिगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन.


काही दिवसांपूर्वी त्यांना किडनी स्टोनचाही त्रास झाला होता. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, ती निगेटिव्ह आली होती. आता मात्र त्यांची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.



हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा