Advertisement

लालबाग मार्केट परिसर ५ दिवसांसाठी सील

लालबाग मार्केटमधील सर्व दुकाने बंद राहणार असून येथील रहिवाशांनाही बाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

लालबाग मार्केट परिसर ५ दिवसांसाठी सील
SHARES
मुंबईत कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील अतिशय गजबजलेल्या लालबाग मार्केट परिसरात कोरोनाचे ७ रूग्ण आढळले आहे. त्यामुळे हा परिसर ५ दिवस सील करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 


लालबाग मार्केटमधील सर्व दुकाने बंद राहणार असून येथील रहिवाशांनाही बाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.  पालिकेच्या एफ दक्षिण विभागाच्या वतीनं बुधवारपासून या परिसरात हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. लाॅकडाऊनच्या काळात लालबाग मार्केट परिसरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून आला नाही. मात्र, लाॅकडाऊन शिथील केल्यानंतर परिसरात कोरोनाचे रूग्ण अधिक वाढू लागले. मागील ४  दिवसात येथे कोरोनाचे ७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने लालबाग मार्केट परिसर  ५ दिवस पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला. 


मुंबईत दररोज १ हजाराच्या दारात कोरोना रुग्ण आढळत आहेत. सोमवारी देखील १ हजार ९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५८६ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत राज्यात एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील २० जणांचा समावेश आहे. 



हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा