Advertisement

मुंबईत 'या' ठिकाणी कंटेनरमध्ये उभारलं आयसीयू केंद्र

कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता पडू नये यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिकेने आता कंटेनरमध्ये दोन बेडचं आयसीयू केंद्र उभारलं आहे.

मुंबईत 'या' ठिकाणी कंटेनरमध्ये उभारलं आयसीयू केंद्र
SHARES

 मुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता पडू नये यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिकेने आता कंटेनरमध्ये दोन बेडचं आयसीयू केंद्र उभारलं आहे. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे हे  आयसीयू केंद्र आहे. या केंद्राचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमत किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

मुंबई महापालिकेने प्रथमच ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे, आयसीयूमधील रुग्णाला डॉक्टरांना बाहेरून रिमोट कंट्रोलद्वारे हाताळता येणार आहे. डॉक्टरांनी रुग्णाला न भेटता रुग्णांवर योग्य ते उपचार करणं शक्‍य होणार आहे. वीस बाय दहा फूट आकाराचं कंटेनरमधील हे दोन बेडचे आयसीयू युनिट आहे. यामध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.  लवकरच अन्य ठिकाणी ही सुविधा सुरू करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार ५८६ इतकी झाली आहे. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. मुंबईत ठिकठिकाणी विलगीकरण केंद्र, पालिकेच्या रुग्णालयात कोरोना वॉर्ड, सामान्यांना मास्क, सॅनिटायझर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. धारावीतील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. केंद्र सरकारनंही धारावीतील रुग्ण संख्या कमी झाल्याबद्दल आणि राज्य सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. 


हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा