Advertisement

कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांत २० टक्के खाटा राखीव

मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील २० टक्के खाटा पालिका आपल्या ताब्यात घेणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांत २० टक्के खाटा राखीव
SHARES

सरकारी रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी खाटा अपुऱ्या पडत असल्याने मुंबई महापालिका यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील २० टक्के खाटा पालिका आपल्या ताब्यात घेणार आहे. तेथे या रुग्णांवर उपचारांचा खर्च पालिका करणार आहे.

पालिका रुग्णालयांतील खाटांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर ताटकळण्याची वेळ आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध असल्या तरी तेथील दर मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाहीत. कोरोना रुग्णावर दोन दिवस उपचार केल्याचे साडेचार लाख रुपये बिल एका खासगी रुग्णालयाने आकारले आहे. यात पीपीईसाठी दर दिवसाला नऊ हजार तर जैववैद्यकीय कचरा विघटनाचेही दर दिवसाचे दर लावण्यात आले आहेत. ‘विविध शुल्क’ या नावाखाली रुग्णालयाने दोन लाख ५० हजार रुपये आकारले आहेत. रुग्णालयांकडून होणारी ही लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने दर नियंत्रणाची नियमावली जाहीर केली आहे. पालिकेने या पुढे जात कोरोना उपचार देणाऱ्या खासगी रुग्णालयातील २० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागातील करोना रुग्णांसाठी असलेल्या खाटांच्या २० टक्के खाटा पालिकेअंतर्गत असतील. या खाटा पालिकेच्या रुग्णांसाठी आरक्षित असून येथे कोणत्या रुग्णांना पाठवायचे याचे नियोजन पालिकेकडून केले जाईल. उपचार हे रुग्णालयांकडून केले जातील. उपचाराचे दर हे आयुष्मान भारत किंवा महात्मा फुले योजनेप्रमाणे रुग्णालयांना आकारले जाणार आहेत. गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना प्रामुख्याने या ठिकाणी पाठवले जाईल. जेणेकरून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध होतील. 

ही रुग्णालये उपलब्ध

नानावटी, के.जे.सोमय्या, फोर्टिस (मुलुंड), एल.एच.हिरानंदानी, पी.डी. हिंदुजा, ग्लोबल, सैफी, लहान मुलांचे एनएच एसआरसीसी, जसलोक, ब्रीच कॅण्डी, वोक्हार्ट, बॉम्बे, पोद्दार, लीलावती, रहेजा, भाटिया ही खासगी रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध आहेत.

 


हेही वाचा -

मुंबईत रात्री 'या' वेळेत घराबाहेर पडण्यावर निर्बंध

रेशनचं धान्य घेताना आता ‘अंगठा’ लावण्याची गरज नाही!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा