Advertisement

पाणी किती आणि कधी प्यावे?


पाणी किती आणि कधी प्यावे?
SHARES

प्रत्येक मानवी शरीराला जेवणासोबत पाण्याची गरज भासते. एका वेळेस माणूस न जेवता राहू शकतो. पण, पाण्याशिवाय जास्त काळ तो जीवंत राहील याची शक्यता खूप कमी असते.

पाणी दर दिवशी 5 ते 6 लीटर पिणे गरजेचे आहे. त्यासोबत आहारही योग्य प्रमाणात घ्यावा असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तुमच्या लघवीचा रंग तुम्ही किती पाणी पिता यावर अवलंबून असतो.

प्रत्येक माणसाच्या शरीराला 2300 मिलीग्रॅम सोडियमची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्यासोबत शरीरात सोडियमची देखील तेवढीच गरज भासते. पण, जर तुमचे वयोवर्ष जास्त असेल किंवा तुम्हाला मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार असतील तर तुम्ही दिवसाला फक्त 1500 मिलीग्रॅम सोडियमचे सेवन करायला हवे.



1 ग्लास पाणी कधी आणि किती प्यावे-

  • पाणी जेवणाच्या अर्धा तास आधी प्या, त्यामुळे जेवण पचनाची क्रिया सोपी होते
  • व्यायाम करण्याच्या 10 मिनिटे आधी पाणी प्या, एनर्जी लेवल कायम राहते.
  • चहा किंवा कॉफी प्यायच्या आधी पाणी प्या, अॅसिडीटीचा त्रास होणार नाही
  • आंघोळीच्या आधी पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास टळू शकतो
  • जास्त तणावाचे वातावरण असेल तर मन आणि डोक्याच्या शांतीसाठी पाणी प्या
  • झोपण्याच्या आधी पाणी प्यायल्याने स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी असते
  • संध्याकाळचा नाश्ता करण्याआधी पाण्याचे सेवन केल्याने जास्त नाश्ता करता येत नाही त्यामुळे तुम्हाला रात्री भूक लागेल
  • जेवण जेवताना फक्त दोन घोट पाणी प्या
  • सकाळी उठल्यावर 2 ग्लास पाणी प्या, त्यामुळे किडनीचा त्रास होत नाही
  • सकाळी व्यायाम केल्यावर 20 मिनिटांनंतर 2 ग्लास पाणी प्या, त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कायम राहते, डिहायड्रेशन होत नाही


कमी प्रमाणात मीठ आणि जास्त प्रमाणात पाणी पिणे हे शरीरासाठी घातकही होऊ शकते. जास्त पाणी प्यायल्याने ‘हायपोनाट्रामिया’ हा आजार होण्याची शक्यता असते. जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडियम पाण्यात विरघळून जाते. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला फिट येऊ शकते, तो कोमात जाऊ शकतो, किंवा प्रसंगी त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.


हेही वाचा - 

ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स !

हळदीचे पाणी रोज सेवन केल्याचे ११ फायदे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा