Advertisement

जागतिक ह्रदय दिनानिमित्त पोलिसांना सीपीआरचे प्रशिक्षण


जागतिक ह्रदय दिनानिमित्त पोलिसांना सीपीआरचे प्रशिक्षण
SHARES

पोलिसांना कामामुळे येणाऱ्या तणावातून बऱ्याचदा त्यांना ह्रदयविकारासारखे आजार आपसूकच जडतात. पण, कधी आपातकालीन परिस्थिती ओढावली तर एखाद्या व्यक्तीला प्राथमिक उपचार कशापद्धतीने दिले जातात, किंवा त्यांना कशाप्रकारे सीपीआर दिला जातो, याचं प्रशिक्षण बुधवारी जसलोक रुग्णालयाकडून देण्यात आलं.

ह्रदयविकार आणि अपघात झाला तर बऱ्याचदा रुग्णांना प्राथमिक उपचार न मिळाल्याने जीव गमवावा  लागतो. या परिस्थितीत रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणं गरजेचं असतं. त्यामुळेच हे प्रशिक्षण पोलिसांसाठी ठेवण्यात आलं होतं.

29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हद्य दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने जसलोक हॉस्पिटलकडून मुंबई पोलिसांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात आलं. या कार्यक्रमाला जवळपास 200 पोलिसांनी उपस्थिती दर्शवली होती. हार्टअटॅक किंवा अपघात याव्यतिरिक्त कामाचा तणाव, मानसिक तणाव यासारख्या गोष्टीही गांभीर्याने घेत त्यावर काय उपाय करावेत याबद्दलही पोलिसांना माहिती देण्यात आली.



भारतात प्रत्येक 5 नागरिकांमध्ये एकाचा मृत्यू हार्टअटॅकने

भारतातील प्रत्येक 5 नागरिकांमध्ये एकाचा मृत्यू हा हार्टअटॅकने होतो. त्याचप्रमाणे तरूणांमध्येही हार्टअटॅकचे प्रमाण वाढतेच आहे.

कोणतीही आपातकालीन परिस्थिती आल्यास रूग्णाला श्वासोच्छवास देणे आणि त्यांचे हद्याचे ठोके कायम ठेवणे हे अगदी मुलभूत असं प्रशिक्षण सीपीआरअंतर्गत दिलं जातं. कोणताही रूग्ण काही कारणाने कोसळला असता प्रथम त्याचं हद्य आणि फुप्फुस हे काम करणं बंद होते. अशावेळी सीपीआर प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. पोलिसांचा ताणतणाव पाहता त्यांच्यासाठी तर फायदेशीर आहेच, मात्र सामान्य लोकांनाही हे माहित असणे गरजेचे आहे. 

डॉ. निहार मेहता, सहाय्यक कार्डिओलॉजिस्ट, जसलोक रुग्णालय


हे ही वाचा -

इडियट नव्हे, चतुर... हार्टअटॅक येऊनही बाईकवरून गाठलं हॉस्पिटल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा