Advertisement

मुंबईतील झोपडपट्ट्या झाल्या कंटेनमेंट झोनमुक्त

मुंबईत आता एकाही झोपडपट्टीत प्रतिबंधित क्षेत्र नाही. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाची एकही रुग्ण आढळलेला नाही.

मुंबईतील झोपडपट्ट्या झाल्या कंटेनमेंट झोनमुक्त
SHARES

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार चाळी आणि झोपडपट्टय़ामधून कमी झाल्याने त्या कंटेनमेंट मुक्त झाल्या आहेत. मुंबईत आता एकाही झोपडपट्टीत प्रतिबंधित क्षेत्र नाही. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाची एकही रुग्ण आढळलेला नाही. 

१४ ऑगस्टपासून सलग ७ दिवस मुंबईतील एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झालेली नाही. कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेली धारावीही कोरोनामुक्त झाली आहे. मुंबईत ६० टक्के नागरिक झोपडपट्टी आणि चाळीत राहतात. या ठिकाणी दाटीवाटीने लोक राहत असल्याने कोरोनाचा प्रसार मोठा झाला होता.  धारावी, वरळी कोळीवाडा आदी भागातील झोपडपट्ट्या आणि चाळी कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्या होत्या. मात्र, पालिका प्रशासन, आरोग्य विभाग यांनी केलेल्या उपाययोजना यामुळे झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेनमेंट झोनमुक्त झाल्या आहेत. 

मुंबईत १३ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार २ झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्या होत्या. १४ ऑगस्टला एकही झोपडपट्टी किंवा चाळ कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. त्यानंतर सलग सात दिवसात एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. मुंबईतून आतापर्यंत २ हजार ७९४ कंटेनमेंट झोनमुक्त झाले आहेत. दरम्यान, २४ इमारती, तर १०८७ मजले आजही सील करण्यात आलेले आहेत. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा