Advertisement

मुंबईला आठवड्याभरात मिळणार ६५० रुग्णवाहिका

मुंबईत ६५० रुग्णवाहिकांची सेवा मिळणार आहे. नागरिकांनी वॉर्डमधील वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवावी, ही सेवा नागरिकांना विनामूल्य मिळणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबईला आठवड्याभरात मिळणार ६५० रुग्णवाहिका
SHARES

मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एका बाजूला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील आरोग्य सेवांवर प्रचंड ताण आलेला आहे. केवळ कोरोनाबाधित रुग्णच नव्हे, तर इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनाही वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याची तक्रार आहे. नव्या ६५० रुग्णवाहिका (mumbai will get 650 ambulance service for corona and other patients says health minister rajesh tope) उपलब्ध झाल्यास अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकेल.

वाॅर रुमशी संपर्क साधा

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, मुंबईकरांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारकडून नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णवाहिकांची उपलब्धतात असेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या ५०० रुग्णवाहिका उपलब्ध असून ५० रुग्णवाहिका महिंद्रा समुहाकडून मिळाल्या आहेत. तर आठवडाभरात १५० रुग्णवाहिका उपलब्ध होतील. त्यामुळे मुंबईत ६५० रुग्णवाहिकांची सेवा मिळणार आहे. नागरिकांनी वॉर्डमधील वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवावी, ही सेवा नागरिकांना विनामूल्य मिळणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा - Coronavirus Updates: उबर अॅपवरून बुक करा रुग्णवाहिका

पर्यावरणमंत्र्यांकडून सेवा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात ८५ रुग्णवाहिका मिळणार आहेत. त्यापैकी २४ रुग्णवाहिकांचं काही दिवसांपूर्वीच बीकेसी इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी १२ रुग्णवाहिकांचं पहिल्या टप्प्यात लोकार्पण करण्यात आलं. त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनी देखील १२ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

५०० आयसीयू बेड्स

मुंबईत आयसीयूचे ५०० बेडस् उपलब्ध होणार आहेत. त्यात आठवडाभरत अजून १०० ते १५० बेड्सची भर पडणार आहे. सेंट जॉर्जेस, बीकेसी, सेव्हन हिल, वरळी डोम, इथं बेडस् वाढविण्यात येत आहेत. कांदिवलीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात २५० बेडस् वाढविण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

गरजूंना प्राधान्य 

ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांच्या ऐवजी जे गंभीर आजारी आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात प्राधान्याने दाखल करून घेण्याविषयी सांगण्यात येत आहे. यासाठी ८० टक्के खाटा घेतलेल्या रुग्णालयांमध्ये एक अधिकारी नेमला जाईल तिथं मदतीसाठी कक्ष उभारला जाईल. लक्षणं नसलेल्या रुग्णांना थेट दाखल न करता गरजूंना दाखल करण्याविषयी हे अधिकारी समन्वय करतील, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा