Advertisement

सर्व्हे जी नॉर्थच्या 'कुटुंबाचा'

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

SHARES

मुंबईत कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार महापालिकेनं (bmc) संपूर्ण मंबईत जनजागृती करण्यास सुरूवात केली. दरम्यान मुंबईतील जी/उत्तर विभागात (g north ward) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असून, येथील डॉक्टरांनी विषेश खबरदारी घेत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.

जी/उत्तर विभागात येणाऱ्या माहिम विभागात डॉक्टर सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती केली जात आहे. अनेकांनी महापालिकेच्या या मोहिमेत सहभाग घेऊन नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करत आहेत. जाहिरात मोहीम हाती घेऊन तसेच सोशल मीडियावरुन जनजागृती करुन 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत माहिती देत आहेत.



हेही वाचा -

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाला जी/उत्तर विभागात चांगला प्रतिसाद

जी/उत्तर विभागात मास्क न घालणाऱ्यांविरोधात महापालिकेची कारवाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा