Advertisement

जी/उत्तर विभागात मास्क न घालणाऱ्यांविरोधात महापालिकेची कारवाई

वारंवार सूचना करूनही अनेक जण मास्क घालत नाही. त्यामुळं मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या जी/उत्तर विभागानं दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

जी/उत्तर विभागात मास्क न घालणाऱ्यांविरोधात महापालिकेची कारवाई
SHARES

मुंबईत कोरोनाचा (Covid 19) प्रादुर्भाव वाढत असून, मागील काही दिवसांपासून महापलिकेच्या जी/उत्तर विभागात (G North Ward) रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं महापालिकेनं अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडा, स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्या, तोंडाला मास्क लावा, हात सतत धुवा या सुचना देत आहे. मात्र, वारंवार सूचना करूनही अनेक जण मास्क घालत नाही. त्यामुळं मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या जी/उत्तर विभागानं दंडात्मक कारवाई (Fine) करण्याचा निर्णय घेतला आहे.

जी/उत्तर विभागात आतापर्यंत तब्बल ५०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, ज्या लोकांशी मास्क घातला नव्हता, अशा लोकांना मास्कचं वाटप केलं. जवळपास ५०० मास्क (Mask) वाटले आहेत. तसंच, कारवाईसोबतच 'मास्क घातल्या बाहेर पडणार नाही', असं वदवून घेतलं. त्याचप्रमाणं त्यांना समज देण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून १ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक प्रकाश साबळे यांनी दिली.


या कारवाईला जी/उत्तर विभागात ८ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. आतापर्यंत सर्वाधिक कारवाई धारावी परिसरात झाल्याचं साबळे यांनी सांगितलं. धारावीनंतर माहिम व दादर परिसरत करण्यात आली. मास्क न घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी (Public place) वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

सुरूवातीला मास्कचा वापर न करणाऱ्यांना १ हजार रुपये दंड करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एप्रिल ते १२ सप्टेंबर या काळात ४ हजार ९८९ जणांकडून ३३ लाख ६८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडाची रक्कम अधिक असल्यामुळं महापालिकेवर (BMC) टीका करण्यात येत होती. तसंच पैसे नसल्यामुळं अनेक जण दंड भरण्यास असमर्थता दाखवीत होते, तसंच दंडात्मक कारवाई करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी वादही घालत होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने १२ सप्टेंबर रोजी दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून २०० रुपये केली. 



हेही वाचा -

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस

अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा