Advertisement

केईएममध्ये 'रोडमॅप', वाॅर्ड आरामात सापडणार


केईएममध्ये 'रोडमॅप', वाॅर्ड आरामात सापडणार
SHARES

केईएम रुग्णालयाचा परिसर इतका मोठा आहे की इथं दाखल असलेल्या रुग्णाला पटकन शोधून काढताना रुग्णाच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होते. एखाद्या वाॅर्डपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी अनेकांना विचारत विचारत जावं लागतं. पण आता रुग्णांच्या नातेवाईकांना वाॅर्ड शोधण्यासाठी फार धावपळ करण्याची गरज लागणार नाही, कारण केईएममध्ये बसवण्यात आला आहे, नवा नॅव्हिगेशन मॅप. या मॅपमध्ये अर्थात आराखड्यात रुग्णालयातील प्रत्येक वाॅर्ड ठळकपणे दर्शवण्यात आला आहे.


का बनवला रोडमॅप?

केईएम रुग्णालय हे पालिकेचं मोठं रूग्णालय असून इथं दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी रुग्णालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.



कुणी केला रोडमॅप तयार?

केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा रोडमॅप तयार केला आहे. या मॅपद्वारे कुठला विभाग कुठे आहे? याची माहिती सहज कळू शकेल. शिवाय, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा मॅप लावण्यात आला आहे. रोडमॅपच्या माध्यमातून केईएम रूग्णालयाच्या जुन्या, नवीन इमारतीकडे जाण्याचा मार्गही दाखवण्यात आला आहे.


२ महिने काम

रूग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा रोडमॅप तयार केला आहे. हा मॅप बनवण्यासाठी साधारणतः दोन महिने लागले. असे एकूण २० मॅप विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. यात जुनी इमारत आणि नवी इमारतीकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांचा मार्ग शोधणं सोपं होणार आहे. त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय



हेही वाचा-

'केईएम'ला डॉ. आनंदीबाई जोशींचं नाव द्या, मनसेची मागणी

केईएम आणि नायर हॉस्पिटल होणार 'फायरप्रूफ'!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा