Advertisement

कोरोनाव्हायरस फक्त फुफ्फुसांसाठीच नाही, तर 'या' अवयवांसाठी घातक

कोलंबिया डॉक्टरांनी या संदर्भात अभ्यास केला. त्यातूनच कोरोना संदर्भात ही नवी माहिती समोर आली आहे.

कोरोनाव्हायरस फक्त फुफ्फुसांसाठीच नाही, तर 'या' अवयवांसाठी घातक
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतआहे. त्यामुळे अधिक चिंता वाढत आहे. त्यात कोरोना संदर्भात दरवेळी काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत असते. आता तर माहिती समोर आली आहे की, कोरोना फक्त फुफ्फुसांवर नाही तर इतर अवयांवरही हल्ला करतो. कोलंबिया डॉक्टरांनी या संदर्भात अभ्यास केला. त्यातूनच कोरोना संदर्भात ही नवी माहिती समोर आली आहे.

कोरोनाव्हायरस हा किडनी, लिव्हर, हार्ट, मेंदू आणि तुमच्या नर्व्हस सिस्टिमवरही हल्ला करतो, असं या तंज्ज्ञांचं मत आहे. कोलंबिया विद्यापीठातल्या (Columbia University) हॉस्पिटलमध्ये गेली तीन महिने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या व्हायरसनं महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला केला तर परिस्थिती आणखी बिकट होते. ज्या व्यक्तिंना इतर आजार आहेत त्यांना धोका जास्त असतो, असं मतही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

तर नुकत्याच जर्मनीमध्ये झालेल्या अभ्यासानुसार कोरोनाबाबत आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होत जाते किंवा बऱ्याजवेळा मेंदू काम करणं बंद करत असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेले आणि प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये अनेक समस्या दिसून आल्या आहेत. थरथर कापणं, सतत बेशुद्ध होणं, हृदयाचे ठोके कमी जास्त होणं इत्यादी. जर्मनीमध्ये तज्ज्ञांनी ११ रुग्णांवर अभ्यास केला ज्यांची प्रकृती कोरोनामुळे खूप खालावली होती. त्यानंतर हे समोर आलं.

फुफ्फुसांवर देखील होणारा परिणाम कोरोना रुग्ण बरा झाला तरी त्याला झेलावा लागू शकतो, हे देखील समोर आलं आहे. कोरोना रुग्ण बरा झाला तरी त्याला भविष्यात अनेक श्वसनाचे आजार संभवू शकतात. याशिवाय भविष्यात त्याला ऑक्सीजनची आवश्यक्ता वारंवार लागू शकते.

कोरोनाव्हायरसवर अनेक देशांमध्ये अभ्यास करण्यात येत आहे. त्यातून नव नवीन माहिती मिळत आहे. यापूर्वी एका विद्यापीठानं केलेल्या अभ्यासातून समोर आलं होतं की, कोरोना पुरुषांच्या शुक्राणूवर देखील परिणाम करतो. त्यामुळे भविष्यात बरे झालेल्या कोरोना रुग्णांना याचा फटका बसू शकतो.हेही वाचा

मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर भागात 'इतके' रुग्ण

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांवर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा