Advertisement

पुन्हा लॉकडाऊन लागणार? क्रेंद्रानं पत्राद्वारे दिल्या 'या' नव्या सुचना

देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्र सरकारनं सगळ्या राज्य सरकारांना पत्र लिहलं आहे.

पुन्हा लॉकडाऊन लागणार? क्रेंद्रानं पत्राद्वारे दिल्या 'या' नव्या सुचना
SHARES

देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्र सरकारनं सगळ्या राज्य सरकारांना पत्र लिहलं आहे. केंद्रानं म्हटलं आहे की, ओमिक्रॉन हा जुन्या डेल्टा व्हेरिएंट पेक्षाही तीन पटीनं वेगाने फसरत आहे. त्यामुळे याला गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं सर्व राज्यांना पत्र पाठवलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वॉर रूम सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा हे दोन्ही विषाणू सध्या देशात तळ ठोकून आहेत. त्यामुळे स्थानिक आणि जिल्हा स्तरावर तातडीनं कार्यवाही करण्याची गरज असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

केंद्र आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे की, देशातील कोरोना आणि ओमिक्रॉन परिस्थितीवर माहिती देण्यात आली आहे. तर काही राज्यात अद्याप ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना कराव्यात याविषयी माहिती देण्यात आली आहे. जर गरज पडण्यास रात्रीचा कर्फ्यू लावण्याची गर्दी न होण्यासाठी कडम नियम लागू करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रानं पाठवलेल्या पत्रात १००% लसीकरण करण्यावर भर द्या, अशी सूचना दिली आहे. तसंच डोर-टू-डोर ओमिक्रॉन तपासण्या कराव्यात. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात ओमिक्रॉनचा आकडा हा २०२ एवढा झाला आहे. त्यातील सर्वात जास्त रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहे. या दोन्ही राज्यात प्रत्येकी ५४-६५ ओमिक्रॉन रुग्ण आहे.

राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या आता ६५ वर पोहोचली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर ओमिक्रॉनचा वाढता फैलाव आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे.

मंगळवारी आढळून आलेल्या ११ ओमिक्रान बाधितांमध्ये ८ जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळून आले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथं प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. आजपर्यंत आढळलेल्या ६५ ओमिक्रॉन बाधितांपैकी ३४ जणांची आरटीपीसआर चाचणी निगेटिव्ह आल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात मंगळवारी ८२५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७९२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.हेही वाचा

मुंबईत आढळले ८ ओमिक्रॉन रुग्ण, कोरोना रुग्णांमध्येही वाढ

नवी मुंबईत 'इथं' आढळला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा