Advertisement

१२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. अशातच आता केंद्राने १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

१२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार
(Representational Image)
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. अशातच आता केंद्राने १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोनाती लस देण्यात येणार आहे.

येत्या १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. यासह, ६० वर्षांवरील सर्व लोकांना आता बूस्टर डोस मिळणार आहे.

या आधी तिसऱ्या लाटेत काही नागरिकांनाच बुस्टर डोस दिला जात होता. आता सर्व ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. याचबरोबर या आधी १४ ते १८ वयोगटाच्या मुलांना कोरोना लस देण्यात येत होती. आता याचा विस्तार करण्यात आला असून १२ ते १४ वयाच्या मुलांनाही लस दिली जाणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा